Skip to main content

रिमझीम रिमझीम...पाउस आला

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 27/09/2010 19:31 या दिवशी प्रकाशित केले.
रिमझीम रिमझीम...पाउस आला

हं...अं.....हं...अं.... हं...अं.....हं...अं.... रिमझीम रिमझीम...रिमझीम रिमझीम रिमझीम रिमझीम...रिमझीम रिमझीम पाउस आला... पाउस आला || झाडावरती पक्षी गाती हिरव्या वेली वरती जाती नाचाला ताल देवून आनंद घेवून आला पाउस आनंद घेवून पाउस आला || सुर्यकिरणे वर चमचम करती दुत रवीचे इंद्रधनू रेखीती आकाशात बघा उंच एकदा पडले उन असूनी धारा || गरगर फिरूनी ओली झाले आभाळातूनी मोती आले भिजल्या अंगी शिरशीर ओली थेंब ओठी नकळत गेले || हं...अं.....हं...अं.... हं...अं.....हं...अं.... रिमझीम रिमझीम रिमझीम रिमझीम रिमझीम रिमझीम रिमझीम रिमझीम पाउस आला... पाउस आला || - पाषाणभेद (दगफोड्या) २७/०९/२०१०
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1271
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

मस्त मस्त !!! पाषाणाला पाझर फुटला म्हणायचा...!!!

मस्त मस्त !!! पाषाणाला पाझर फुटला म्हणायचा...!!!