निसर्गाची भाषा
आई फक्त माणूसच बोलू शकतो का?
नाही बाळा, सारी सृष्टी बोलते आपल्याशी ऐक जरा. फक्त भाषा भिन्न असते.
____
चंद्राची भाषा चांदणे, सूर्याची भाषा रवीकिरणे
वार्याची भाषा झुळकेची, समुद्राची अलवार गाजेची ||१||
पिंपळवृक्षाची सळसळ, नदीनाल्यांची खळखळ
सार्यांचे मन उमगेल तुला, स्तब्ध शांत करशील मना||२||
कमळ बोलतसे उमलण्यामधुनी, मधमाशी ती कष्टांमधुनी
पहाड बोले अचलपणांतुनी, नभ ते त्याच्या पोकळीतुनी||३||
मौन होउनी संवाद साध बघ, आकळेल निसर्ग तुला
सार्यांचे मन उमगेल तुला, स्तब्ध शांत करशील मना||४||
हं...
सुं सुं बोले वारा , भरे
>> सुं सुं बोले वारा , भरे
छानच..
व्वा ! छानंय कविता आपल्या