Skip to main content

अनंत.....

लेखक स्पंदना यांनी गुरुवार, 23/09/2010 11:25 या दिवशी प्रकाशित केले.
सोहोळ्यातुन सोहळ्याकडे चालले आयुष्य सारे, सोहळा हरेक घडी क्षणी बदलताच वारे ॥ चाहुल लागता जन्माची प्रथम सोहळा घडे, मातृपद देउन तिजला हळुवार पाउल पुढे ॥ नामकरण अन उष्टावण भरभरुन जमती जन, वाढदिसांची त्यातच गणती वर्षांचे उठवुन व्रण ॥ सोहळे शिक्षणा आधी सोहळे शिक्षणा नंतर, कळे न जीवनी कशास सोहोळ्यांचा हवा मंतर ॥ सोहळा प्रत्येक पायरी विवाह; नोकरी; यश भर त्यातच सणासुदिंची उस्तव, आठवुन तो ईश ॥ आला संपत जन्म पण सोहळे पुरुन उरले, रौप्य, सुवर्ण, हिरक जरतारी वस्त्र लाभले ॥ उपस्थिती चे संपले सोहळे अन, अनुपस्थिती आता, श्राद्ध, वर्षस्मरण, पुण्यतीथीच्या घडती जनात बाता ॥
अपर्णा.
काव्यरस

वाचने 1646
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

In reply to by अवलिया

छान...! -दिलीप बिरुटे

छान ...