पाल बोले सरडीला , जळले गं अंग,
अंग अंग होळी झाले , शेपटीचा भंग.
ओट्यावरी होते , दूध आणि पाव,
माशी खेळे लोण्यासंगे , नाचे डासराव,
झुरळाच्या मिश्यावरी , तुपाचे तवंग.
तापुनिया दूध , साय वर येई,
गिळण्या या चंद्रबिंबा , पाल झेप घेई,
जन्म तुझा पालीचा गं , नव्हे बजरंग.
सोडुनिया शेपटाला , पाल मुक्त होई,
नासकवणीसाठी , घरभर घाई ,
जळे काया कुठे , कोणी खाण्यामध्ये दंग.
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3316
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्तच नासकवणी खाताना नक्की
मस्तच
नासकवणी खाताना नक्की आठवण येइल :)
आयायायाय गं! एकेक ओळ लै लै लै
आयायायाय गं! एकेक ओळ लै लै लै भारी! __/\__
असेच म्हणते ! फारच छान !
In reply to आयायायाय गं! एकेक ओळ लै लै लै by मेघवेडा
असेच म्हणते !
फारच छान !
आता नासकवणी माझ्या खाण्याच्या
आता नासकवणी माझ्या खाण्याच्या पदार्थातून बाद!
बाकी विडंबन छान!
ओट्यावरी होते , दूध आणि पाव,
माशी खेळे लोण्यासंगे , नाचे डासराव,
झुरळाच्या मिश्यावरी , तुपाचे तवंग.
हे फार आवडले.
भन्नाट
भन्नाट ....................एकदम चुरगळुन मुरगळुन थुकलास मित्रा.......... :=))
प्रतिभाशक्तीस दाद..
एकदम चुरगळुन मुरगळुन थुकलास
In reply to भन्नाट by डावखुरा
एकदम चुरगळुन मुरगळुन थुकलास मित्रा
हा हा हा... भन्नाट कवितेला, भन्नाट प्रतिसाद!
सगळ्या आवडीच्या पदार्थांवरच
सगळ्या आवडीच्या पदार्थांवरच घाला घातलंन
__/\__
मस्त विडंबन!
(वारकरी)बेसनलाडू
मस्त...अव्द्ले
मस्त...अव्द्ले
विरजण
छान विरजण घातलत की मिठायांवर!
ईईईईईईईईईई!!!!!!!!!!!!
अडगळीतूनच हे सगळे येऊ शकते!!!
;)
भन्नाट!!
झक्कास विडंबन! बाकी या
झक्कास विडंबन!
बाकी या मेव्याने, लोळण्याच्या नादात, एच्टीएमेल कोडचंही विडंबन केलेलं दिसतंय प्रतिसादात!
खल्लास
[श्रेयअव्हेर - मेवे]
मस्त विडंबन :)
(विषय दिलेला नाही)
हा हा हा =))
हा हा हा
=))
मस्त
नासकवणीशी साधलेलं नातं छानच...
मस्त
मस्त विडंबन
__/\__
चेतन
अजुन एक 'अडगळ' स्पेशल
अजुन एक 'अडगळ' स्पेशल
वा !
एकदम झकास !
वंटास!!
एकदम बेगॉन विडंबन! ;)
चतुरंग
हीट ......
हीट ......
सर्व वाचकांचे आभार
(पाली पारंगत )श्री . पालखाल्लास्की