Skip to main content

उन्हाळी दुपार...

लेखक वैभव देशमुख यांनी शुक्रवार, 17/09/2010 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
उन्हाळी दुपार सुस्तावले रान मुके पानपान जाहलेले आंब्याच्या पानात पाखरे गुडुप मेंढ्यांचा कळप आंब्याखाली बाभूळ झाडाची फाटकी सावली तेथे विसावली गुरे काही सुक्या नदिकाठी नग्न उभे साग आकाशात आग लागलेली कुणी एक बाई सरपण शोधात लेकरू पोटात वाढताना... - वैभव देशमुख
लेखनविषय:

वाचने 1705
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया