कविता - २
किती कथा, किती व्यथा.....
इथून-तिथून, अशा तशा
ह्याच्या-त्याच्या, माझ्या-तुझ्या
चार भिंती, चार फरशा !
आत-आत खोल-खोल
भिरभिर फिरता एक भोवरा...
सांग ना आता कुठे-कसा
शोधून सापडेल खरा चेहरा ? ?
पापणीवर येवून थांबलेला थेंब
ओठावर येवून लांबलेला शब्द...
मन पछाडलेला एक प्रश्न,
ही नियती, की प्रारब्ध ? ? ?
सुरुवात आवडली
छान
शोधून सापडेल का खरा चेहरा
मनापासून
छान आहे.
धन्यवाद!
किती कथा, किती
छान...
छान !