मी लिहायचं
तुम्ही नावाजायचं
मी आनंदायचं
परत लिहायचं
हा आपलातुपला गंमतनाच!
नाचातली गंमत पळून जाताना पाह्यली पर्वा.
लिहिण्याचा हात धरून पळून गेली.
खूप विनवलं तिला थांब म्हणून.
पण ऐकेना.
तिचं टुमणं एकच
आळस सोड कष्ट कर
कसं जमावं?
जातेस तर जा बाई, मी कोण अडवणार तुला!
पण शक्य असेल तर लिहिण्याला सोड.
'त्याच्याशिवाय मी आणि माझ्याशिवाय लिहिणं
कल्पना तरी कशी करू शकतेस तू?'
गंमत आपला स्वभाव सोडून फणकारली!!
गेलीच निघून
आता मी नाही लिहायचं
तुम्ही लिही ना म्हणायचं
माझी मान वर
तुम्ही परत लिही ना म्हणायचं
आता माझी कॉलरच ताठ!!
स्वतःला कुरवाळण्याचा उगाच-नाच!!
-इतिश्री निर्जाबाई उवाच!!
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1715
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
ओळखीचं वाटतंय!!! हे वाचून
गप्प रे
In reply to ओळखीचं वाटतंय!!! हे वाचून by बिपिन कार्यकर्ते
छान स्फुट
सोप्पं आहे...
हो ना.... आमची कुवत सामान्य
In reply to सोप्पं आहे... by राजेश घासकडवी
हम्म!
का गं? असं का वाटलं तुला
सगळ्यांचे