Skip to main content

कविता माझी होशील का ?

लेखक निरन्जन वहालेकर यांनी बुधवार, 18/08/2010 12:09 या दिवशी प्रकाशित केले.

कविता माझी होशील का ?

भेटलीस तू अवचित मजला,
प्रीतिचा नव वसंत फुलला,
प्राजक्त होऊनी वसंतातले,
कवनी माझिया बरसशिल का ?
कविता माझी होशील का ?

रिमझिम रिमझिम पावसातल्या,
च्रोरून अपुल्या भेटीगाठी,
आठवणीत त्या चिब होऊनी,
कवनी ओलेती प्रगटशिल का ?
कविता माझी होशील का ?

काय जाहले गमे न मजला,
आभासे तू ठायी ठायी,
आभासांचे गंध होऊनी,
कवना गंधित करशिल का ?
कविता माझी होशील का ?

सांगायचे मज बरेच काही,
मनांत तुझिया तसेच विरले,
उकलूनीया ती गुपिते सगळी ,
कवन सांगता करशील का ?

निरंजन वहाळेकर

काव्यरस

वाचने 2186
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

In reply to by अनामिक

शीर्षकावरून अंमळ गोंधळ झाला खरा (कविता, माझी होशील का? असे (न दिलेल्या) विरामचिन्हांसकट वाचले गेले)
(मिश्किल)बेसनलाडू