मावळतीला रंग शोधणारा ढग मी...
पावसाळ्यात इंद्रधनुसवे रंगणारा पावसाचा थेंब मी
अन कधी कधी सात रंगाशी नाते जोडणारा इंद्रधनू मी
माझ्या पंखांसाठी फुलांचा रंग वेचणारे फुलपाखरू मी
अन कधी रंगासाठी आसुसलेला रंगपेटीतला कुंचला मी
तुझ्या डोळ्यात माझ्या स्वप्नांसाठी रंग शोधणारा वेडा मी
अन कधी उन्हाळ्यात उन्हासवेच रंगणारा प्रियकर गुलमोहर मी
कधी पहाटेला सूर्यासवे भगव्यात रंगणारा शुक्रतारा मी
अन कधी मावळतीला स्वत:साठी रंग शोधणारा ढग मी
सुरेख !!
फार सुंदर
फ्रॅक्चर बंड्या
इष्टमनकलर कविता.. जमलिये
अगदी
कलरफुल धन्यवाद ...