जीव तुझा कासावीस ...
तू गं उभी अंगणात
माफी मागताना मला
एका हातामधी झाडू
एक कानापाशी गेला
आधी पुंजा गोळा केला
पुन्हा पांगून टाकला
तुझं अंगण झाडणं
असं उन्हाच्या वेळेला
हसू फुटलं तरीही
हसू दाबलं ओठात
गेलो उठून घरात
खोट्या रागाच्या भरात
दार लावून घेतलं डोळा फटीशी लावला
जीव तुझा कासावीस मी गं होताना पाहिला...
- वैभव देशमुख
कविता आवडली
डाऊन टू अर्थ कविता.
सुंदर
आवडली.
आवडली
मस्तं कविता आहे आवडली. बाकी
मस्तच...
भन्नाट ! लय भारी !
धन्यवाद...