मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(माझी जन्माची शिदोरी )

अडगळ · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
क्रांती ताई, माफी असावी मूळ कविता : http://www.misalpav.com/node/13405 तुझा भात गं जळका भाकरी ही ढाल जशी , तुला पाहताच मेली , अन्नपूर्णा पटदिशी. बासुंदीत ही दोडके, हे का नव्हते थोडके, आमरसात बटाटे, आली शिर्‍यात हाडके. शिव्या तरी किती घालू , गेली विटाळून वाणी, तुझ्या बापानं का कधी, दिली चहाला फोडणी ? यावे यमा रेड्यावरी, आतड्याचे तुम्ही वाली जळो , मरो ही शिदोरी, नरकाची मेस बरी

वाचने 2533 वाचनखूण प्रतिक्रिया 16

केशवसुमार 30/07/2010 - 02:47
अडगळशेठ, हे विडंबन नसून एक उत्तम हास्य कविता आहे.. एकदम झकास.. चहा फोडणी, नरकाची मेस.. हा हा हा.. चालू दे.. (स्वयं स्वयंपाकी)केशवसुमार

बासुंदीत ही दोडके, हे का नव्हते थोडके, आमरसात बटाटे, आली शिर्‍यात हाडके आमरसात बटाटे पर्यंत नुसतंच छान होतं, पण शिऱ्यातली हाडकं हे कहर...

क्रेमर 30/07/2010 - 03:10
नवनवीन विषय हाताळून श्री अडगळ मराठी आंतरजालावरील विडंबनास वेगळी वाट दाखवत आहेत, असे वाटते.

चतुरंग 30/07/2010 - 03:12
एकदम जोरदार काव्य! ;) शिव्या तरी किती घालू , गेली विटाळून वाणी, तुझ्या बापानं का कधी, दिली चहाला फोडणी ? हे भलतंच आवडलं!! =)) =))

भाऊ पाटील 30/07/2010 - 15:05
उत्तम हास्यकविता. (मूळ कविता वाचली नसल्यासही रसास्वादात काही फरक पडत नाही....त्यामुळे विडंबन म्हणत नाही.)