Skip to main content

(माझी जन्माची शिदोरी )

लेखक अडगळ यांनी शुक्रवार, 30/07/2010 02:38 या दिवशी प्रकाशित केले.
क्रांती ताई, माफी असावी मूळ कविता : http://www.misalpav.com/node/13405 तुझा भात गं जळका भाकरी ही ढाल जशी , तुला पाहताच मेली , अन्नपूर्णा पटदिशी. बासुंदीत ही दोडके, हे का नव्हते थोडके, आमरसात बटाटे, आली शिर्‍यात हाडके. शिव्या तरी किती घालू , गेली विटाळून वाणी, तुझ्या बापानं का कधी, दिली चहाला फोडणी ? यावे यमा रेड्यावरी, आतड्याचे तुम्ही वाली जळो , मरो ही शिदोरी, नरकाची मेस बरी
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2545
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

अडगळशेठ, हे विडंबन नसून एक उत्तम हास्य कविता आहे.. एकदम झकास.. चहा फोडणी, नरकाची मेस.. हा हा हा.. चालू दे.. (स्वयं स्वयंपाकी)केशवसुमार

In reply to by केशवसुमार

हेच म्हणतो. (फक्त कंसाचा अपवाद)

बासुंदीत ही दोडके, हे का नव्हते थोडके, आमरसात बटाटे, आली शिर्‍यात हाडके आमरसात बटाटे पर्यंत नुसतंच छान होतं, पण शिऱ्यातली हाडकं हे कहर...

नवनवीन विषय हाताळून श्री अडगळ मराठी आंतरजालावरील विडंबनास वेगळी वाट दाखवत आहेत, असे वाटते.

एकदम जोरदार काव्य! ;) शिव्या तरी किती घालू , गेली विटाळून वाणी, तुझ्या बापानं का कधी, दिली चहाला फोडणी ? हे भलतंच आवडलं!! =)) =))

उत्तम हास्यकविता. विडंबनाचे लोढणे नसते तर अधिकच खुलवू शकला असता.

एकदम चमचमित!! 'तुझ्या बापानं का कधी, दिली चहाला फोडणी ?' तर ढणटड्याण ..टड डड्याण..

ह ह पु वा

झकास!!!

उत्तम हास्यकविता. (मूळ कविता वाचली नसल्यासही रसास्वादात काही फरक पडत नाही....त्यामुळे विडंबन म्हणत नाही.)

शिदोरी असावी तर अशी!