Skip to main content

मंद जाहल्या तारका.....

लेखक निरन्जन वहालेकर यांनी बुधवार, 28/07/2010 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
मंद जाहल्या तारका....... मंतरलेले दिवस ते चंद्र होता साक्षीला, पुनवेच्या राती रुपेरी प्रेमरंगी तुजसवे नाहल्या. रात्र होती तरुण अन यौवनी मी तुजसवे, मोरपंखी मधुर स्वप्नात तू गंध रातराणीचा दरवळे. मदहोश मी, बेधुद तू चंद्र मजकवे सामावला, हलकेच डोकाउनी नभातून तारकाहि गाली लाजल्या. आजही रात्र तैसीच आहे गंध तोच रातराणीचा दरवळे ? ? ? ? ? ? ? चंद्र नाही आज मजकवे तारकाहि मंदावल्या.नभीच्या निरंजन वहाळेकर
काव्यरस

वाचने 1287
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

धन्यवाद ! सुचनेचे स्वागत ! पण पूर्वीसारखी "संपादन" ची सोय दिसत नाही म्हणून "मदहोश" ऐवजी " बेभान " हा शब्द बदलता आला नाही