हातचा
===============
.
.
हाती अर्धाच प्याला,
म्हणता सौख्य कळेना..
अवीट जीवन गोडवा,
मग जिभेवरी रुळेना..
.
स्वीकार मीच न केला,
माझ्या अपूर्णतेचा..
आसवांच्या अंध धारा,
राहिल्या देत ठेचा..
.
हाती अर्धाच प्याला,
जो तो बघे रिकामा..
धडपडा जीव "वेडा",
हताश नि निकामा..
.
जन्म आशा निराशा,
मन आंदोल साहवेना..
हातचा आधार विसरता,
जीवनी संघर्ष चुकेना..
.
हाती अर्धाच प्याला,
म्हणता सौख्य कळेना..
हा सोहळा असण्याचा,
हृदयांतरी खुलेना..!
.
बेरजेत मोजावयाचा,
हातचा राहून गेला..
जोडून त्यास घेता,
गोषवारा नवाच आला..
.
हाती अर्धा (च) प्याला,
कोट कोट सुखाचा...!
हाती अर्धा (च) प्याला,
काठो-काठ सुखाचा...!
.
.
===============
स्वाती फडणीस... २१०११०
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1835
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
वेगळीच मीती आहे या कवितेला.
वेगळीच मीती आहे या कवितेला. मला भलतीच आवडली. सुपर्ब!!!
वा
वा! कवितेतून मांडलेला दृष्टिकोन पटो न पटो, त्यात ताकद आहे आणि रचनेतही ताकद आहे हे निश्चित. दोन दिवसांत दोन ताकदीच्या कविता वाचायला मिळाल्या. ही एक आणि दुसरी प्रार्थना.
वा!
आवडली कविता.
:)
:)
श्लेष आवडला
तो मिळवल्यावर - हातचा - प्याला भरतो...
हाती अर्धा (च) प्याला,
In reply to श्लेष आवडला by राजेश घासकडवी
हाती अर्धा (च) प्याला,
कोट कोट सुखाचा...!
हाती अर्धा (च) प्याला,
काठो-काठ सुखाचा...!
व्वा!! सुरेख.
व्वा!! सुरेख.
आभार..!
:)
अतिशय सुंदर ! !
बेरजेत मोजावयाचा,
हातचा राहून गेला..
जोडून त्यास घेता,
गोषवारा नवाच आला.
. व्वा ! क्या बात है !