(केव्हा तरी पहाटे)
केव्हा भल्या पहाटे उठवून माय गेली
खुलले जराच डोळे वरडून माय गेली
सांगू तिला कसा मी वेळ गाढ झोपण्याची
उडवून शाल, पाणी शिंपडून माय गेली
कळले मला न केव्हा चढली रात्री जराशी
कळले परि मला हो भडकून माय गेली
उठले घरात काही आवाज भांडणाचे
पेले चा-पाण्याचे आपटून माय गेली
स्मरते मला न तेव्हा वदलो मी काय रात्री
मग वेळ मेसेजाची दाखवून माय गेली
(काल रात्री घरी यायला अंमळ उशीर झाल्याने चिडलेल्या आमच्या आईने सकाळी लवकर न उठण्यावरून आमची चांगली हजेरी घेतली. त्यावेळच्या समर प्रसंगाचे हे संक्षिप्त वर्णन.)
**अन्यत्र पूर्वप्रकाशित
पुन्हा
वा पु.पे
हा हा हा
+ १
लै भारी रे
लै भारी
ही ही
झ्याक टाईमपास...
केव्हातरी
मस्त रे !!
सॉलीड!
मस्त!
पेशव्या,
हेच
ही.. हा... हा....
मस्त
मस्त! ह ह पु
मस्तच! यावर
चांगले विडंबन
मस्त! _______________
झ्याक रे पुप्या!!
सर्व