Skip to main content

(केव्हा तरी पहाटे)

लेखक llपुण्याचे पेशवेll यांनी बुधवार, 21/07/2010 19:29 या दिवशी प्रकाशित केले.
केव्हा भल्या पहाटे उठवून माय गेली खुलले जराच डोळे वरडून माय गेली सांगू तिला कसा मी वेळ गाढ झोपण्याची उडवून शाल, पाणी शिंपडून माय गेली कळले मला न केव्हा चढली रात्री जराशी कळले परि मला हो भडकून माय गेली उठले घरात काही आवाज भांडणाचे पेले चा-पाण्याचे आपटून माय गेली स्मरते मला न तेव्हा वदलो मी काय रात्री मग वेळ मेसेजाची दाखवून माय गेली (काल रात्री घरी यायला अंमळ उशीर झाल्याने चिडलेल्या आमच्या आईने सकाळी लवकर न उठण्यावरून आमची चांगली हजेरी घेतली. त्यावेळच्या समर प्रसंगाचे हे संक्षिप्त वर्णन.) **अन्यत्र पूर्वप्रकाशित
लेखनविषय:

वाचने 3070
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

वा पु.पे बुधवारच्या कविता मंगळ्वारी येऊ लागल्या. छान आहे कविता. --------------- धनंजय बोरगांवकर

हा हा हा =)) =)) =)) पुपे परत वाचली पण यावेळी अजुन मज्जा आली. (तुमच रुपड डोल्या म्होर उब र्‍हायल बगा या येळी.)

ही ही ही ही ही :)) मायच्या आयडिया मस्त आहेत. अजमावून पहायला हव्यात. पण आमच्या घरात सर्वात उशीरा उठणारी मीच आहे. :$ मीनल. http://myurmee.blogspot.com/

केव्हातरी असंही होऊ द्यायचं असतं. उशिरा उठत चला पण लिखाणाच्या बाबतीत नको. कारण आपण पुण्याचे! ************************************* माझं पुस्तक, माझा ब्लॉग.

मस्तच! याचे कोणीतरी रसग्रहण करावे ;) (का कवितेच्या मुळाशी रसग्रहणच आहे? :?)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हेच म्हंतो. या निमित्ताने पुप्याने बुधवारचे सदर पुन्हा सुरु करावे. -Nile

हे रा़क्षसी हास्य होते....! ....अशी अस्सल हजेरी.....कोणी घेतली नाहि हो बरेच दिवसात... एकदम आठ्वण आली.... .....उद्या होउनच जाउ दे!....

मस्त --अवलिया आपला तो बाब्या दुस-याचं ते कार्ट, असं धो धो रण करणारं धोरण सगळ्यांचच असतं, आपल्यासाठी एक अन् दुस-यासाठी वेगळं :)

मस्त! ह ह पु वा. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

मस्तच! यावर उपाय म्हणजे रात्री घरी यायला उशीर झाला न झाला तरीही सकाळी लवकर उठू नये!

ताजा अनुभव, स्वानुभव, प्रामाणिक कथन हे सर्व असल्यामुळे हे विडंबन नेहमीच्या धोधो विडंबनांपेक्षा वेगळे आहे. आवडले.

सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार. पुण्याचे पेशवे येथे प्रतिसादांना पंख लावून मिळतील