मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गीत: पहाटे पहाटे जवळ तू ये ना

पाषाणभेद · · जे न देखे रवी...
काव्यरस
पहाटे पहाटे जवळ तू ये ना
पहाटे पहाटे जवळ तू ये ना धुंदीत झोपतांना जागी तू हो ना पहाटे पहाटे मिठीत तू ये ना ||धृ|| थंडी गुलाबी न सोसणारी अशातच रात्र गेली न संपणारी अनुभूती वेगळी सारी, आली माझीया तना पहाटे पहाटे जवळ तू ये ना ||१|| आठवणी सार्‍या डोळ्यात जाग्या होवोनी झोप ही सुखाची डोळ्यात येवोनी स्वप्नात माझ्या तू येशी का पुन्हा पुन्हा पहाटे पहाटे जवळ तू ये ना ||२|| आठवून सारी रात झोपलेली उमगते गुढ काव्य मंतरल्या वेळी रोम रोम फुलले अंगी सुखावी तना पहाटे पहाटे जवळ तू ये ना ||३|| मखमली त्या केसांत सारे विश्व माझे मलाच फासणारे गुंतवून माझे मला मी सोडवू कुणा पहाटे पहाटे जवळ तू ये ना ||४|| मोगर्‍याचा सुगंध वेड लावतो जीवा माळलास तो तेव्हाचा, कुस्करला केव्हा? समरसून अलिंगना नाही म्हणू नको ना पहाटे पहाटे जवळ तू ये ना ||५|| पहाटे पहाटे जवळ तू ये ना धुंदीत झोपतांना जागी तू हो ना पहाटे पहाटे मिठीत तू ये ना ||धृ|| - पाषाणभेद (दगडफोड्या) १५/०६/२०१० ( पहाटे ५:१७!)

वाचने 2120 वाचनखूण प्रतिक्रिया 4

अविनाशकुलकर्णी 15/06/2010 - 18:49
मोगर्‍याचा सुगंध वेड लावतो जीवा माळलास तो तेव्हाचा, कुस्करला केव्हा? समरसून अलिंगना नाही म्हणू नको ना पहाटे पहाटे जवळ तू ये ना ||५| क्या बात है मस्त..

jaypal 15/06/2010 - 20:11
"मखमली त्या केसांत सारे विश्व माझे मलाच फासणारे गुंतवून माझे मला मी सोडवू कुणा पहाटे पहाटे जवळ तू ये ना ||४|| मोगर्‍याचा सुगंध वेड लावतो जीवा माळलास तो तेव्हाचा, कुस्करला केव्हा? समरसून अलिंगना नाही म्हणू नको ना पहाटे पहाटे जवळ तू ये ना ||५||" वा!! पाषाणा वा !! भलताच व्याकुळ दिसतोस वर्षा रुतुचा परिणाम का? *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/