Skip to main content

रातराणी ? ? ? अरे बाप रे ! ! !

लेखक निरन्जन वहालेकर यांनी बुधवार, 26/05/2010 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
रातराणी ? ? ? अरे बाप रे ! ! ! मोकळ्या केशसंभारांत पाठमोरी उभी ती मंद चांदण्यांत भासे रातराणी परी ती वाटे जणू बोलाविते साद देऊन मजला वाढली धडकन दिलाची पाहुनी एकान्ती तिजला विचारी मना “ काय आता करावे ” ? “ मुखचंद्रमा तरी आज पाहून यावे “. गेलो भेटण्या समीप लोक म्हणतील काय ? पाहुनी एकांती आम्हा जळतील हाय. जाऊन समीप हलकेच न्याहाळले, अन जाहला चंद्र तेजोमय नभीं s..s..s..s..s..s..s थरथरली मम काया भीतीने हाय रे दुर्दैव ! पाठमोरी सासूच् होति उभी निरंजन वहाळेकर
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1790
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

खरं की काय ? तुमची पार फे फे उडाली असेल. जय महाराष्ट्र , जय मराठी !

मोकळ्या केशसंभारांत पाठमोती उभी ती
पाठमोती की पाठमोरी ? :? आणि हो नंतर तुमची अशी काही अवस्था झाली का?
अविचारी मना आता काय करावे? क्षमायाचना तरी करुन यावे. गेलो माफी मागण्या लोके म्हणतील काय? टाकुनी जात्यात आम्हा दळतील काय?
- पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश... माझी छायाचित्रे - फ्लिकर

In reply to by पांथस्थ

टाकुनी जात्यात आम्हा दळतील काय? superb ! ! ! Great ! ! ! काय म्हणावे आता ? धन्यवाद !

=)) =)) काय डोळ्याच्या खाचा झाल्यात का काय? मैत्रिण आणी सासूतला फरक कळत नाय? का स्वतःच्या मरणाला ओढवुन घ्यायची एव्हढी घाई? :D (ह.घ्या. हो निरंजनबुवा. :) )