केव्हा तरी ...
केव्हा तरी असा, साज तुझा थांबलेला
तुटलेल्या तारा तरी, सूर तुझा रेंगाळलेला ।
शब्द थांबले ओठी, जल राहीले नेत्री
स्वर तुझा मायेचा, काळजात दाटलेला ।
सोळा शृंगार माझे, दर्पणी या राहीले
वेणीतील मरवा, तुझ्या श्वासानेच गंधाळलेला ।
मैफिल संपता जासी, निः संग होउनी तु
सैरभैर तुझ्यासाठी, जीव माझा व्याकूळलेला ।
काटा रुते तुझ्या पायी, कळ माझ्या काळजात
उंबर्यात या माझा, पाय कसा थांबलेला ।
लेखनविषय:
याद्या
2572
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
सोळा
अहो नाव
In reply to सोळा by स्पंदना
सुरेख
सोळा
साधी सोपी
छान कविता...
कविता फार
हळुवार आणि सुंदर
व्वा!! फार
सोळा
कविता आवडली
आवडली