Skip to main content

केव्हा तरी ...

केव्हा तरी ...

Published on सोमवार, 24/05/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
केव्हा तरी असा, साज तुझा थांबलेला तुटलेल्या तारा तरी, सूर तुझा रेंगाळलेला । शब्द थांबले ओठी, जल राहीले नेत्री स्वर तुझा मायेचा, काळजात दाटलेला । सोळा शृंगार माझे, दर्पणी या राहीले वेणीतील मरवा, तुझ्या श्वासानेच गंधाळलेला । मैफिल संपता जासी, निः संग होउनी तु सैरभैर तुझ्यासाठी, जीव माझा व्याकूळलेला । काटा रुते तुझ्या पायी, कळ माझ्या काळजात उंबर्‍यात या माझा, पाय कसा थांबलेला ।
लेखनविषय:

याद्या 2572
प्रतिक्रिया 12

सोळा शृंगार माझे, दर्पणी या राहीले वेणीतील मरवा, तुझ्या श्वासानेच गंधाळलेला । मैफिल संपता जासी, निः संग होउनी तु सैरभैर तुझ्यासाठी, जीव माझा व्याकूळलेला । =D> व्वाह! मनिष! व्वाह! शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

In reply to by स्पंदना

अहो नाव मनिषा आहे...कवयित्रीला तुम्ही कवी करुन टाकल.. हलकेच घ्या ;)

शब्द थांबले ओठी, जल राहीले नेत्री स्वर तुझा मायेचा, काळजात दाटलेला । - हे फार आवडलं.

सोळा शृंगार माझे, दर्पणी या राहीले वेणीतील मरवा, तुझ्या श्वासानेच गंधाळलेला । मैफिल संपता जासी, निः संग होउनी तु सैरभैर तुझ्यासाठी, जीव माझा व्याकूळलेला । क्या बात है!!!

साधी सोपी छान कविता! :) .. स्वर तुझा मायेचा, काळजात दाटलेला । ..उंबर्‍यात या माझा, पाय कसा थांबलेला । ह्या ओळी विशेष! पु.ले.शु. राघव

काटा रुते तुझ्या पायी, कळ माझ्या काळजात उंबर्‍यात या माझा, पाय कसा थांबलेला । इथे उंबर्‍यात या माझा, पाय कसा थांबलेला मात्र कळलं नाही. - फटू

कविता फार आवडली. मलाच आता सैरभैर वाटतय ती वाचून :( .... खूप करूण आहे खरच सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

व्वा!! फार सुंदर रचना. - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/

सोळा शृंगार माझे, दर्पणी या राहीले वेणीतील मरवा, तुझ्या श्वासानेच गंधाळलेला । सुंदर... :) मदनबाण..... Hi IQ doesn't guarantee Happiness & Success in Life.

कविता आवडली . मीनल. http://myurmee.blogspot.com/