सख्या हो दिलवरा तल्वार दुर धरा

पाषाणभेद जे न देखे रवी...
सख्या हो दिलवरा तल्वार दुर धरा सख्या हो दिलवरा तल्वार दुर धरा जवळी मज करा होवू निसंग आता बाजूस करा हो कमरबंद ||धृ|| कितीक दिसानं येता आज घरा डोळं लावूनी वाटं उभी अशृ नाही थारा कसर काढा आता जल्माभरची मी संगती असता करा लढाई बेधूंद आता बाजूस करा हो कमरबंद ||१|| तुम्ही जरी शत्रू मारीले, धुळ चारीले तुरे खोवीले, बिल्ले लाविले छातीवरी काय कामाची अशी मुलूखगिरी होईल सवत करील दोघात अंतर रूंद आता बाजूस करा हो कमरबंद ||२|| - पाषाणभेद (दगडफोड्या) २४/०५/२०१०
वर्गीकरण
काव्यरस

9 टिप्पण्या 2,001 दृश्ये
शेअर करा: 📱 WhatsApp

Comments

टारझन नवीन

सख्या हो दिलवरा तल्वार दुर धरा
पण षिर्षक वाचुन मरायला टेकलो =)) बाकी हा पाभ्या लेका ... एखादा म्हैला आय.डी. काढुन अशी काव्य टाकली तर रोमांच तरी अनुभवता येतील ;) नाव पाषाणभेद .. आणि कविता स्त्रीयाचणेची ? - (तलवार धारी) टारझन गोल्डस्वार्ड

पाषाणभेद नवीन

In reply to by टारझन

टारझन भाऊ, (भाऊ म्हणनं महिलांच्या दृष्टीने सेफ आहे. म्हणून म्हटले हो भाऊ. ) तुम्हाला काय माहिती की हा आयडी पुरूषाचा आहे म्हणून. कदाचित तो महिलेचाही असू शकतो. भडकमकर मास्तर हे नाही का ताई झाले होते. असो. भाऊ. अन भाईचा आयडी आहे असे न समजता पाषाणभेदनी असे वाचा मग. हय काय न नाय काय, काय? :-) The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा माझी जालवही

परिकथेतील राजकुमार नवीन

=)) =)) हाणतेज्यायला !!
मी संगती असता करा लढाई बेधूंद आता बाजूस करा हो कमरबंद ||१||
ह्या ओळी काळजाला भिडल्या. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

पाषाणभेद नवीन

काय ये की, लावनी जास करूनशान पेशवेकाळात फुलली. आन त्या वक्ताला सैनिक मुलूखगिरी/ लढाया करूनशान लय कटाळा करायचे. त्यास्नी मग कायतरी इरंगूळा नगो का? म्हून मंग लावन्या व्ह्यायच्या. आताच्या काळात सैनिकांना आसले काय प्रोगराम कराया मिळत न्हाईत. म्हून पुण्यासारख्या ठिकानी सैनिक लोकं- मागल्या म्हैन्यात केलेत तशे- चाळे करत्यात. आसो. वरल्या पयल्या कडव्यात आताच्या जमान्यातल्या सैनिकांसाठी 'बंदूक' हा शबूद वापराया हारकत न्हायी. आन जुन्या जमान्यात छापखान्यात खिळे कमी र्‍हायचे आन काय काय येळेला खिळे अ‍ॅडजेस्ट करावा लागायचे. तसला परकार दावण्यासाठी शिर्षकात 'तलवारी' ऐवजी 'तल्वार' लिवेल हाय. (ही सुचना टारझन 'भाऊ' साठी बरं का रे भावड्या!) The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा माझी जालवही

फटू नवीन

आमी "सुंदरा मनामधी भरली" च्या चालीवर म्हनुन बगितली आनी जमली पन. लिवित र्‍हा. वाचायलाय आमी हावच. :P - फटू

पाषाणभेद नवीन

In reply to by फटू

क्या बात है! फटूजी, जरा ती चाल पटकन ऐकवा ना राव! नाय म्हंजे मुळ लि़ंक दिली तरी चालल. The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा माझी जालवही