आभास
लेखनविषय:
काव्यरस
तुझं माझं नातच आभासांचं
कधी खूप खूप खोल वाटणारं,
थेट जाउन हृदयाला भिडणारं,
काळजाला हात घालणारं,
पण कधी क्षणात उथळ होणारं,
अनोळखी वाटणारं !
मग खरं काय असतं ?
ते खूप खोलवर घाव घालणारं,
हृदयाला साद घालणारं ?
का पाण्याची वाफ व्हावी
त्याप्रमाणे क्षणात उडून जाणारं ?
शेवटी आभासच सारे !
त्यात खरं काय आणि खोटं काय !
तुझं माझं नातच आभासांचं
शब्दांशिवायच भावना बोलणारं,
मुकेपणानेच एकमेकांना साद घालणारं,
हुरहुर लावणारं, धुंदी आणणारं,
पण कधी कधी हे मुकेपणसुद्धा बोलेनासं होतं
निशब्दता पण अनोळखी होते.
मग खरं काय असतं ?
ते मुकेपणातून प्रेम बरसणं ?
की ती अनोळखी निशब्दता ?
शेवटी आभासच सारे !
त्यात खरं काय आणि खोटं काय !
वाचने
1678
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
पण कधी कधी हे मुकेपणसुद्धा बोलेनासं होतं
निशब्दता पण अनोळखी होते.
मग खरं काय असतं ?
ते मुकेपणातून प्रेम बरसणं ?
की ती अनोळखी निशब्दता ?>>>>>>>>
खरय, शेवटी आभासच सारे ! :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
विशाल, धन्यवाद.
आशा करते कि प्रतिक्रीया हा आभास नाही आहेत. :)
तुझं माझं नातच आभासांचं
शब्दांशिवायच भावना बोलणारं,
मुकेपणानेच एकमेकांना साद घालणारं,
हुरहुर लावणारं, धुंदी आणणारं
छान ! ! कविता आवडली ! ! !
धन्यवाद निरंजन.
पाण्याची वाफ व्हावी
त्याप्रमाणे क्षणात उडून जाणारं
सुन्दर
प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद sur_nair
पण कधी कधी