मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आभास

वर्षा म्हसकर-नायर · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
तुझं माझं नातच आभासांचं कधी खूप खूप खोल वाटणारं, थेट जाउन हृदयाला भिडणारं, काळजाला हात घालणारं, पण कधी क्षणात उथळ होणारं, अनोळखी वाटणारं ! मग खरं काय असतं ? ते खूप खोलवर घाव घालणारं, हृदयाला साद घालणारं ? का पाण्याची वाफ व्हावी त्याप्रमाणे क्षणात उडून जाणारं ? शेवटी आभासच सारे ! त्यात खरं काय आणि खोटं काय ! तुझं माझं नातच आभासांचं शब्दांशिवायच भावना बोलणारं, मुकेपणानेच एकमेकांना साद घालणारं, हुरहुर लावणारं, धुंदी आणणारं, पण कधी कधी हे मुकेपणसुद्धा बोलेनासं होतं निशब्दता पण अनोळखी होते. मग खरं काय असतं ? ते मुकेपणातून प्रेम बरसणं ? की ती अनोळखी निशब्दता ? शेवटी आभासच सारे ! त्यात खरं काय आणि खोटं काय !

वाचने 1678 वाचनखूण प्रतिक्रिया 6

विशाल कुलकर्णी 04/05/2010 - 13:04
पण कधी कधी हे मुकेपणसुद्धा बोलेनासं होतं निशब्दता पण अनोळखी होते. मग खरं काय असतं ? ते मुकेपणातून प्रेम बरसणं ? की ती अनोळखी निशब्दता ?>>>>>>>> खरय, शेवटी आभासच सारे ! :-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

वर्षा म्हसकर-नायर 04/05/2010 - 13:11
विशाल, धन्यवाद. आशा करते कि प्रतिक्रीया हा आभास नाही आहेत. :)

निरन्जन वहालेकर 04/05/2010 - 13:14
तुझं माझं नातच आभासांचं शब्दांशिवायच भावना बोलणारं, मुकेपणानेच एकमेकांना साद घालणारं, हुरहुर लावणारं, धुंदी आणणारं छान ! ! कविता आवडली ! ! !

sur_nair 04/05/2010 - 21:05
पाण्याची वाफ व्हावी त्याप्रमाणे क्षणात उडून जाणारं सुन्दर

वर्षा म्हसकर-नायर 04/05/2010 - 22:51
प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद sur_nair