तू असं यावस......
तू असं यावस....
नकळत........
थंडगार वाऱ्याच्या झुळकी सारख....
गरम उन्हाच्या झळा माग साराव्यास...
विसावलेल्या देहाला वेटोळावस...
तप्त कपोलावरचे घर्मबिंदू अधरांनी टिपावेस..
आणि,
अगदी मोकळ; निर्व्याज हसावस...
तू असं यावस.....
तू असं यावस.....
उबदार किरणासम...
गारठलेल्या मनाला उबीची शिदोरी घेऊन ...
थकलेल्या तनाला; उभारीच हसू घेऊन..
धुतल्या सोनेरी रुपेरी रंगांत...
मलाही रंगवत, हसत ;खिदळत...
तू असं यावस....
आणि
तू असही यावस...
तडाडता कडाडता वळीव होऊन ...
तृष्णेला दूर सारीत , तृप्तीला भोवळ आणित....
रसरसलेल्या देहाला शांतवत....
टपोरा टपोरा थेंब होऊन सडाडत.....
तू असही यावस.....
तू असही यावस.....
झक्कास
व्वाह !
काय मस्त
क्या बात
झक्कास