Skip to main content

राम...

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 20/04/2010 10:07 या दिवशी प्रकाशित केले.
अताशा मनाच्या पसार्‍यात राम नाही, बहाणे मनाचे…, दिलाशात राम नाही ! सुखाचे जरी हे पुरावे हजार हाती, मनाला कसा तो भुलाव्यात राम नाही ! इशारे फुलांचे…., अता भूलणार नाही, फुलांच्या मनी राहिला आज राम नाही ! कशाला हवे चंद्र.., तार्‍यांचे चांदणेही, अता चांदण्यांच्या लकाकीत राम नाही ! हसावे, रडावे, मना त्यात गुंतवावे, उसासे फुकाचे.., खुलाशांत राम नाही ! विशाल.
लेखनविषय:

वाचने 1444
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

" इशारे फुलांचे…., अता भूलणार नाही, फुलांच्या मनी राहिला आज राम नाही ! " व्वा ! मजा आली ! ! ! मस्तच ! ! !

आवडली. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ Music and poetry only reach the ears of those in anguish.

आवडली कविता....! -दिलीप बिरुटे