Skip to main content

शेत देईल पिवळं सोनं

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 13/04/2010 13:50 या दिवशी प्रकाशित केले.
शेत देईल पिवळं सोनं
एक दिलानं काम करूया, झाडून सारे घाम गाळूया हात उचला बिगीनं रं बिगीनं शेत देईल पिवळं सोनं... शेत देईल पिवळं सोनं...
रांग धरा ही आडवी आडवी पुढे जायची मारा मुसंडी आडवं करा रे पिक त्यातून शेत देईल पिवळं सोनं... शेत देईल पिवळं सोनं...
विळा चालवा सरसर सरसर, कणसं आणा खळ्यात झरझर रास करा उफनूनं दाणं रं दाणं शेत देईल पिवळं सोनं... शेत देईल पिवळं सोनं...
थ्रेशर चाले थडथड थडथड जोंधळे पडती त्यातून भरभर भरा पोती कमरेत लवूनं रं लवूनं शेत देईल पिवळं सोनं... शेत देईल पिवळं सोनं...
गंगाधर मुटे आमच्या श्येताच्या कापणीच्या येळी जातीनं हजर व्हते म्हुन ह्या कवितेरूपी धान्याचं पिक भरघोस आलयां.
-पाषाणभेद (दगडफोड्या) १३/०४/२०१०
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1618
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

पाषाणभेद साहेब, तुम्ही मिपा काबीज करणार दिसतंय. पाहतो तिथं तुमचंच लिखाण. एकदम जोशात आलात वाटतं.