मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वेड

स्पंदना · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
तुझी न माझी जोड न जमली तुला न त्याची फिकीर कधी । तरी मनाची गुप्त कवाडे परस्परांवर सतत खुली ॥ जागेपणीच्या स्वप्नी म्हण वां स्वप्नातल्या जागेपणी । सतत चाहूल नजरेची त्या स्पर्श गंध हृदयी ॥ रूप आठवे, आठवते स्मित अजुनी उघडती नेत्र एकदम । जणू धडकला हनुवटीस या तो खांदा फिरून ॥ धर्म जाणते मी माझा मनास माझ्या उंबरठा । पण, दोन तपांच्या राखेखाली अजुनी निखारा धगधगता ॥

वाचने 2439 वाचनखूण प्रतिक्रिया 8

Dhananjay Borgaonkar 08/04/2010 - 11:34
क्या बात है अपर्णातै...झक्कास कविता.
धर्म जाणते मी माझा मनास माझ्या उंबरठा । पण, दोन तपांच्या राखेखाली अजुनी निखारा धगधगता ॥
एक नंबर.. =D> =D>

अरुंधती 08/04/2010 - 20:15
दोन तपांच्या राखेखाली अजुनी निखारा धगधगता ...... व्वा! अरुंधती http://iravatik.blogspot.com/

बेसनलाडू 08/04/2010 - 22:43
प्रामाणिक, भावपूर्ण कविता आहे. सुंदर! गेयतेच्या दृष्टीने किरकोळ बदल केल्यास आणखी छान वाटेल. (आस्वादक)बेसनलाडू

प्राजु 08/04/2010 - 23:05
दोन तपांच्या राखेखाली अजुनी निखारा धगधगता ॥ अप्रतिम!! - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/

टारझन 08/04/2010 - 23:21
फारंच "करूण""प्रेमकाव्य" ! व्वा ! -कविवर्य यकृतनाथ नाकशिकर