Skip to main content

"मिड-लाइफ क्रायसिस" अर्थात एका लेखकाचे 'मनोगत'

लेखक केशवसुमार यांनी गुरुवार, 18/02/2010 10:12 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली भरपूर शिकवण्यातून वेळ मला असतो 'आयुष्याच्या मध्या वरचा घोळ' मला छळतो वळवळणारा किडा नाही बसू देत शांत खाज सुटून शिवशिवतात रोज माझे हात विचार करून डोक्याचा या होतो नुसता भुंगा शेवटी म्हटलं जालावरती करू थोडा दंगा लिहायला बसलो आणि लक्षात माझ्या आलं पुन्हा एकदा जाणवलं आपलं वय झालं पूर्वीसारखं आता मला जमत नाही काही म्हणून म्हटलं घिसेपिटेच लिहू काहीबाही हॉटेलातल्या माणसांना चिमटे काढू आज नंतरच्या चर्चेने मग नक्की भागेल खाज कण्हतकुथत 'बनी' गत 'हणम्या' उभा केला ओढून ताणून कसाबसा लेख पूर्णं केला काठावर बसून आता मजा बघतील कोणी विरजण घालता घालता अन काड्या घालतील कोणी हातोड्याने "केश्या"च्या येव्हढं मला कळलं आहे कुस्करी होत नाही तोवरच मस्करीत मजा आहे
लेखनविषय:

वाचने 5620
प्रतिक्रिया 27

प्रतिक्रिया

=D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

है शाब्बास... !!!

अपन एक मारा लेकिन सॉलिड मारा की नही ? ;-)

हेच... हेच... जुने जालकरी असे बोलू लागले की जान येते.

:D :D :D :D :D :D :D ********** भले तर देऊ कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी ॥

जुगलबंदी आवडली. ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

In reply to by शुचि

हॅहॅहॅहॅ .. - जुगल हंसराज

पुन्हा एकदा जाणवलं आपलं वय झालं पूर्वीसारखं आता मला जमत नाही काही म्हणून म्हटलं घिसेपिटेच लिहू काहीबाही सुंदर....! :) [ इथे आम्ही जाग्यावर उभे राहून आपल्या कवितेला दाद देत आहोत असे चित्र डोळ्यासमोर आणावे] स्वगत : बरं झालं कवी महाराज तुमची कविता आली. नै तर आम्ही आता काय लिहावं म्हणून अस्वस्थ होतो. आता कसं शांत शांत आणि मस्त वाटतंय...! :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नै तर आम्ही आता काय लिहावं म्हणून अस्वस्थ होतो. तुम्हालाही मिडलाईफ क्रायसीसनं गाठलं की काय? ;)

In reply to by श्रावण मोडक

>>>तुम्हालाही मिडलाईफ क्रायसीसनं गाठलं की काय? श्रामो, व्यनीने कळवायच्या ना राव आपल्या भावना..! ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अर्र... चुकलं, चुकलं... ;)

वाहव्वा! मस्त! बरे झाले फटकारलेत! रेवती

अस्वस्थ आत्म्यांना व्यासपीठ उपलब्द्ध करुन दिलेत, हे छान झाले. काय आहे, हल्ली तथाकथित साहित्यिकांना प्रतिभा सोडून गेली आहे. मिड लाईफ क्रायसिस- दुसरं काय? एक्झिटच्या अपेक्षेत असणार्‍यांनी आणि त्यांच्या फटकारतृप्त वामांगांनी अपेक्षभंगाची तयारी ठेवावी. वेळ मिळतो हे गृहितक बाकी बरोबर नाही. वेळ काढावा लागतो. लगेचच पळपुटेपणा वगैरे शब्द शोधून ठेवणार्‍यांसाठी हे डिस्क्लेमर. खाज बाकी भागली. आता कसं शांत शांत आणि मस्त वाटतंय...! सन्जोप राव जगण्यात मजा आहे, तोवरच मरण्यात मजा आहे.

In reply to by सन्जोप राव

हॅ हॅ हॅ... एक वेळ मिड-लाईफ क्रायसिस परवडला. काहींचा अजूनही मिड-वाईफ क्रायसिस सुरू आहे असे दिसते. बाकी, नुकतीच प्रकाशित झालेली "एक क्वार्टर कमी पडते" ही सर्वांगसुंदर कविता, आणि हणम्याचा काही संबंध आहे का, ह्याचा अभ्यास सुरू आहे. काल तर मला चक्क चित्तरंजन भट मिसळपावावर दिसले ! -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

काठावर बसून आता मजा बघतील कोणी विरजण घालता घालता अन काड्या घालतील कोणी हातोड्याने "केश्या"च्या येव्हढं मला कळलं आहे कुस्करी होत नाही तोवरच मस्करीत मजा आहे ह्या ओळी पटल्या. बाकी मस्करीची कुस्करी झालेली नाही, हे पटलेले नाही. असो.

In reply to by सुवर्णमयी

हा मिडलाइफ क्रायसिस आजकाल नेमका कधीही चालू होतो आणि किती काळ चालतो.. ह्या संदर्भात गेल्या आठवड्यातील टाईम साप्ताहीकातील हा लेख पहा. :-) ____________________________ मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

केश्या, जबराच रे! :) तात्या.

बर्‍याच जणांचे जीव भांड्यात पडण्याचा आवाज आला :)

हातोड्याने "केश्या"च्या येव्हढं मला कळलं आहे कुस्करी होत नाही तोवरच मस्करीत मजा आहे
हातोड्यासहित माणुस आवल्डा नी मनोगतबी आवल्डे! प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

पुन्हा एकदा जाणवलं आपलं वय झालं पूर्वीसारखं आता मला जमत नाही काही म्हणून म्हटलं घिसेपिटेच लिहू काहीबाही हॉटेलातल्या माणसांना चिमटे काढू आज नंतरच्या चर्चेने मग नक्की भागेल खाज कण्हतकुथत 'बनी' गत 'हणम्या' उभा केला ओढून ताणून कसाबसा लेख पूर्णं केला वा वा वा वा झक्कास.

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी) केशवसुमार

:) चलने दो केशवसुमारजी ....चलने दो :)

आयला!!! केसुशेठचा दणका!!! जबरी... बिपिन कार्यकर्ते

बाकी, कविता लैच आवडली. :) [दुसर्‍यांदा प्रतिक्रिया लिहितोय तो स्वतःचा आनंद वाढविण्यासाठी. धागा वर यावा म्हणून नव्हे ] -दिलीप बिरुटे