ती समीप माझ्या येते, निसटुन जाते
मी स्तब्ध, बावरी मलाच विसरुन जाते
ती देउन जाते अर्थ नवे शब्दांना
जोजवते हृदयी सृजनाच्या स्वप्नांना
संध्यारंगांसह नभात मिसळुन जाते
तळहाती रेखुन अलगद हलकी रेषा
तनमनी जागवुन नवी अनामिक भाषा
ती मोहरलेल्या क्षणांत हरवुन जाते
मी त्या रेषेवर लिहिते काहीबाही
ते मनासारखे कधीच उमटत नाही
ती सहजच त्या ओळींना सजवुन जाते
ती रसिक, साजिरी सखी कल्पना माझी,
ती कविता, आराधना, साधना माझी
निर्भेळ सुखाच्या राशी उधळुन जाते
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4177
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
नवीन वर्षातल्या पहिल्या कवितेचे स्वागत!
नेहमी प्रमाणे मस्तच
+१
In reply to नेहमी प्रमाणे मस्तच by jaypal
फारच सुंदर!
+१
In reply to फारच सुंदर! by प्रमोद देव
+२
+३
In reply to +२ by sneharani
+४
In reply to +३ by टोळभैरव
वा...
नादलेस..
सुरेख
निर्भेळ
झकास !
मी त्या
तरल ..... सुन्दर ....
ती रसिक,
क्रांतिता
वा!!