Skip to main content

तुझ्या विना ...

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 15/12/2009 15:32 या दिवशी प्रकाशित केले.
क्षण एक हा जरासे आज हसून घेईन म्हणतो हसता हसता नकळत थोडे, रडून घेईन म्हणतो...! सुख-दु:खाच्या फूटपट्टीचे निकष लावुनी आयुष्या सरणावर जाण्यापूर्वी, थोडे जगून घेईन म्हणतो...! आयुष्याच्या या रंगपटावर खोटे खोटे जगताना फसवुनी सत्यास, स्वप्नात रंगून घेईन म्हणतो...! गेले ते दिन गेले सये तव सहवासाचे सोनसळी साजिरे तव सहवासाचे, क्षण गुंफून घेईन म्हणतो...! हा प्रवास युगा युगांचा तुजवीण नको नकोसा तव आठवणींना सार्‍या, संगे बांधून घेईन म्हणतो...! विशाल.
लेखनविषय:

वाचने 2901
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

गेले ते दिन गेले सये तव सहवासाचे सोनसळी साजिरे तव सहवासाचे, क्षण गुंफून घेईन म्हणतो...! फारच छान.. मस्त आहे binarybandya™

In reply to by फ्रॅक्चर बंड्या

गेले ते दिन गेले सये तव सहवासाचे सोनसळी साजिरे तव सहवासाचे, क्षण गुंफून घेईन म्हणतो...! मलाही याच ओळी आवडल्या...! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

असेच म्हणतो. मित्रा, खरंच खूप दर्जेदार लिहितोस... :* स्वानन्दाचे डोही स्वानन्द तरंग!

प्राजुतै.... लै लै धंकू बर्का ! :-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

वि. कु. मस्त रे भावा. ------------------------ The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी

छान आहे कविता. "सुख-दु:खाच्या फूटपट्टीचे निकष लावुनी आयुष्या सरणावर जाण्यापूर्वी, थोडे जगून घेईन म्हणतो...!" ...........या ओळी विषेश आवडल्या *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

आभारी आहे. सगळ्यांचे धन्यवाद :-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"