Skip to main content

शनिवारचा उतारा - खात्री

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी शनिवार, 14/11/2009 14:04 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्याच्या पेशव्यांच्या बुधवारच्या कवितांवरच्या पुढच्या उतार्‍याची ही प्रेरणा . . लेखनाची सुरूवात नेहेमी निवेदनात्मक असते शेवटास येता येता लेखन हास्यास्पद असते पहिली 'विनोदा'ची खात्री निवेदन संपताच होते पण प्रसिद्धीच्या स्वप्नाने काकांचे* ऊर भरून येते वाचने कमी प्रतिसाद नाही मन सैराभैरा होते टाळ्या वाजवता स्वतःच्या "बघू काय होते?" सुटता संयम काकांचा* शून्यच हाती येते +१ आणि विरोधांची बेरीज मन विदीर्ण करते नवी लिंक नवा धागा जुनीच टेप वाजू वाजू पहाते विरोधासाठी निमित्तमात्र अदिती शनिवारीच लिहीते! . लेखनाची सुरूवात नेहेमी निवेदनात्मक असते शेवटास येता येता लेखन हास्यास्पद असते . . *कोणी ठराविक काका नाहीत, पण एकूण प्रतिसादलोलुप लेखकांच्या मनोवृत्तीला काका असं 'नाव ठेवलं' आहे.
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2835
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

शनिवारचा उतारा खरं तर रविवारी सकाळी यायला हवा, पण असो (किंवा नसो).

उतारा मस्तच. मात्र त्याची 'मात्रा' लागू होणार की नाही याबद्दल साशंक आहे.
नवी लिंक नवा धागा जुनीच टेप वाजू वाजू पहाते विरोधासाठी निमित्तमात्र अदिती शनिवारीच लिहीते! . लेखनाची सुरूवात नेहेमी निवेदनात्मक असते शेवटास येता येता लेखन हास्यास्पद असते
--- क्या बात है! एकंदरीत तुमचा व्यक्तीला विरोध नसून प्रवृत्तीला आहे हे स्पष्ट केल्यामुळे तुम्हांला (तथाकथित नव्हे) विचारवंत म्हणायला हरकत नसावी. बाकी अलीकडे बर्‍याचदा एल.पी. अडकून थकले रे नंदलाला चे दलाला, दलाला [संदर्भ - भाईकाकांचं लेखन] ऐकू येण्याचं प्रमाण वाढलं आहे, हेही खरं.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी


In reply to by नंदन

अवांतर: विचारवंत झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!!! आता विचार करायला लागायला हरकत नाही. बिपिन कार्यकर्ते

तरी आम्ही सांगत होतो की अवखळकरतै 'भयानक भयानक गाण्याचे' व्हिडीओ बघु नका. उतारा भयंकर छान जमला आहे आणि हो स्वतःला बदलीनच आणि हो अजुन काय म्हणता आणि हो व्यनितुन उत्तर दिले आहे. ©º°¨¨°º© बधिर पाठलाग ©º°¨¨°º© आमचे राज्य

चालू द्या --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

कविता (का स्वगत?) आवडली.... कोणी ठराविक काका नाहीत, पण एकूण प्रतिसादलोलुप लेखकांच्या मनोवृत्तीला काका असं 'नाव ठेवलं' आहे. असे फक्त "काका"च असतात का? समानतेच्या जमान्यात अशा काकू-मावश्या नसतात का? ;)

कविता (का स्वगत?) आवडली.... एवढ्या पुरतेच सहमत. त्यातही कंसाशीच...

हॅ हॅ हॅ. छान जमली आहे. आता १०-१२ कौतुकाचे व्यनि पाठवून दाखवतोच. बाय द वे, अंमळ प्रसिद्ध झाल्यासारखे वाटत आहे. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984