Skip to main content

वर्तुळ......

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 24/08/2019 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
हजारो वर्षांची संस्क्रुती असलेल्या आपल्या भारतात कर्तबगार स्त्रीयांची वानवा कधीच नव्हती. पुराणकाळात ज्यांनी वेद्याध्ययन केले अशा गार्गी आणि मैत्रेयी आणि गणीत शिकणारी लिलावती तसेच द्रौपदी तारा मंदोदरी अहिल्या सीता या पंचकन्या अशी फार जरी नसली तरी उदाहरणे आहेत. राज्यकारभाराचे धडे देवून एक आदर्श राजा घडवणार्‍या जिजाऊसाहेब, लढवय्यी झाशीची राणी , गोरगरीबांचे जीवन सुकर करणार्‍या अहिल्या देवी होळकर , या स्त्रीयांनी एक इतिहास घडवला. एक काल असा होता की मुलगी जन्माला येणे हेच मुळी अपषकुनी मानले जायचे.

नेनचिम - विज्ञान कादंबरी

लेखक nishapari यांनी शनिवार, 24/08/2019 14:13 या दिवशी प्रकाशित केले.
नारायण धारपांच्या " नेनचिम " ही विज्ञान काल्पनिका कादंबरीत अतिप्राचीन काळात चंद्रावर मनुष्यसदृश्य जातीची वसाहत होती अशा विषयावर आधारित आहे ... त्या जातीची खूप वैज्ञानिक प्रगतीही झाली होती .. त्यातच त्यांचा ग्रह कालांतराने जीवनासाठी अयोग्य होणार , सर्व जीवित नष्ट होणार असा शोध तिथल्या शास्त्रज्ञांना लागतो आणि तिथे हलकल्लोळ माजतो ... हळूहळू परिस्थिती नियंत्रणाखाली येते आणि या प्रश्नावर उपाय शोधण्यासाठी एक मोठी शास्त्रज्ञांची संघटना उभारली जाते ... वसतीयोग्य असा दुसरा ग्रह शोधणं त्यांना शक्य होत नाही ...

सावज (भाग २)

लेखक अनाहूत यांनी शनिवार, 24/08/2019 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ : http://misalpav.com/node/45068 तिच्या डोळ्यात धुंद होऊन त्याने त्याचे ओठ तिच्या ओठावर टेकले आणि त्यांचा रस तो प्राशन करू लागला . त्याला समजतच नव्हत जास्त धुंदी कशात आहे , तिच्या डोळ्यात कि तिच्या ओठात . तो कितीतरी वेळ त्यांच प्राशन करतच होता . दोघंही एकमेकांना उत्तेजित करत होते . तो नवखा असला तरी त्याच्या स्पर्शाने ती वेडी झाली होती . ते अजूनही foreplay पर्यंतच होते . अजून त्याने खऱ्या विषयाला सुरुवातही नव्हती केली होती . तेव्हढ्यातच तिची हि दशा झाली होती . ती या पूर्वरंगातच इतकी उतावीळ झालेली कि तिला आता खऱ्या सुखाची ओढ लागली होती .

सहजच..

लेखक प्रमोद पानसे यांनी शनिवार, 24/08/2019 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
कधीतरी असं वाटतं ना की एखादं आपलं आवडत गाणं ऐकाव .आठवतं अचानक आणी ऐकायची इच्छा होते.मग लगेच एखाद्या म्युझिक ॲप मधुन ते शोधुन ऐकतोही आपण.पण तेवढी मजा नाही येत.एक फक्त इच्छा झालीये आणी ती पुर्ण करणं लगेच शक्य आहे म्हणून असेल कदाचित् पण नाही येत मजा .आणी मन कोरडंच रहातं. मानसिक अस्वास्थ्य असेल ,विमनस्क अवस्थेत बाहेर पडतो एखाद्या चहाच्या टपरीवर सिगरेट पेटवतोय समोर चाच्याने चहा आणून ठेवलाय.आणी अचानक fm वर तेच गाणं लागलं तर ..मुड झकास होउन जातो.हे छोट्या आयुष्यातलं छोटसं सरप्राइज असतं . एखादा चेहरा रोज आठवत असतो .कधीकाळी रोज तो बघण्याची ओढ असणारा ,आणी ठराविक वेळी रोज बघायला मिळणारा .पण त्या वेळेची

सूर

लेखक दिनेश५७ यांनी शनिवार, 24/08/2019 11:02 या दिवशी प्रकाशित केले.
सूर अष्टमीच्या अंधाऱ्या रात्री कारागृहात जन्मलेल्या बाळाला डोईवरल्या टोपलीत टाकून वसुदेवानं यमुना पार केली आणि गोकुळातल्या नंदाच्या राजवाड्यात यशोदेच्या झोळीत आपलं बाळ टाकून डोळे पुसत त्या बालिकेला घेऊन तो कारागृहात परतला. ...सारं काही ठरल्यासारखं पार पडताच काळोख मिटवून उगवलेल्या सूर्याच्या पहिल्या किरणांनी कारागृहाच्या झरोक्‍यातून कोठडीतल्या त्या ‘देवकीच्या बाळा’चं पहिलं दर्शन घेतलं, आणि ‘अवतारकार्य’ सुरू करण्याचा इशारा केला. त्या किरणांकडे पाहात त्या नवजात बालिकेनं पहिलं "ट्यॅऽहां' केलं... पहारेकऱ्यांना जाग आली.

श्रीकृष्णायनम:!

लेखक ज्योति अळवणी यांनी शनिवार, 24/08/2019 09:36 या दिवशी प्रकाशित केले.
श्रीकृष्णायनम:! नमस्कार, या वर्षाच्या सुरवातीपासून मी माझा ब्लॉग 'मनस्पंदन' सुरू केला आहे. दर शुक्रवारी मी त्यावर एक पोस्ट टाकते. मात्र कालचा पहिला शुक्रवार की मी माझ्या ब्लॉगवर काही पोस्ट केलं नाही. रात्री बारा वाजून गेले आणि माझ्या लक्षात आलं की आजची पोस्ट राहिलीच. खूप चिडले मी स्वतःवर. पण मग विचार केला; काही हरकत नाही. लेख तर तयार आहे... नृत्यांगना.... अहं... चा भाग 3. सकाळी लवकर पोस्ट करून टाकू. रात्री झोपायला तसा बराच उशीर झाला होता. श्रीगोपाळाच्या जन्मोत्सवाला गेले होते ना. घरी येताना त्याचेच विचार मनात घोळत होते. गंमत म्हणजे झोपेत देखील तोच मनात पावा वाजवत होता.

कृष्णजन्म

लेखक मायमराठी यांनी शुक्रवार, 23/08/2019 21:42 या दिवशी प्रकाशित केले.
कान्हा ! कुठून रे अक्षरं आणू? कसे शब्द बांधू? कश्या भावना गुंफू? हजार नावं घेऊ? का शब्दब्रह्म गाऊ? तुळशींनी सजवू? मनमखरात बसवू? का पंचप्राणंच अर्पू? सगळंच उष्टावलयंस तू ? कशाचा नैवेद्य दाखवू? निळाईसंग उत्तुंग आभाळी, सावळदंग अभंग सावली, मिस्कीलढंग अनंग माऊली, मयूरपंखी रंग तुझ्या कपाळी ।। सावरीत मुग्ध अलगुज, ऐकवीत गुप्त हितगुज, खेळवीत मुक्त गाईगुजं, प्रकटीत तृप्त आत्मगुज ।। तुज प्रकाशे चेतविती, संध्या या गर्भवती, शुद्ध चैतन्या प्रसविती, पुन्हा आकाशी उगविती ।। जन्मांचा जन्म जिथे, मृत्यूंचाचा मृत्यु जिथे, दिशांचा अंत जिथे, नियतीला खंत जिथे ।। शब्दांना सारूनी मागे, देहाला ठेवुनी जागे, बुद्धीच