Skip to main content

आवाहन

Published on गुरुवार, 14/08/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
जयालागी ध्यास, नामाची आस, कोण श्रीमंत दास, तयावीण. भावाची प्रचीती, राम स्वयें सांगाती, प्रेमाची महती, वर्णावी किती!! रामाचे पायी, जया चारी धाम, विचारांचे काम, तयासी कैसे. मोजावे कशास उरलेले दिन, नामी समाधान, आनंदी असावे. राम ठेवी जोवर, त्याचे असावे तोवर, अन् निघावे सत्त्वर, हाक येता! नामी राहावे मन, नाम असावे प्राण, मुमुक्षूचे आवाहन, सगळ्यांसी. मुमुक्षू [टिप: ही कविता आधी दुसरीकडे याच नावाने प्रकाशीत केलेली आहे. येथेही आवडेल अशी आशा करतो.]

याद्या 3056

दृष्टी

Published on गुरुवार, 14/08/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
दृष्टी वर्तमानाच्या खांध्यावर बसून भविष्याकडे पाहीले. धुक्यातून काहीच दिसेना पण ऐकू आले अस्पष्ट नाद. बोलावणारे, भुरळ पाडणारे. त्या नादाचे बोट पकडुन सुखाच्या शोधात जावे म्हटले. पण ठेच लागण्याच्या भितीने पाउल पुढेच पडेना! भुरळ पाडणारे नाद येतच होते. नंतर तेही धुक्यात विरून गेले. धुके आणखिनच दाट. मी मुके धुके ऐकत तिथेच थिजलेला. .............. वर्तमानाच्या खांद्यावर बसून मागच्या दिशेला भूत पाहीले. स्वच्छ प्रकाशात उजळलेल्या वाटा फ़ुले काटे खड्डे रस्ते महाल झोपड्या स्पष्ट ऐकू येणारे नाद, संगीत, सूर, बेसूर. अगदी डोळे मिटून, कोणाचेही बोट न पकडता जाऊ शकेल मी त्या दिशेला. पण फक्त
लेखनविषय:

याद्या 1682
Taxonomy upgrade extras

(काळाची गरज)

Published on गुरुवार, 14/08/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
प्रात:स्मरणीत विडंबन भास्कर केशवसुमारांना स्मरुन ही आजची टुकारी सादर आहे. आजच्या टुकारीची प्रेरणा हष॑द आनंदी साहेबांची काळाची गरज एक प्रतिसाद पाहिजे, कौतुकात चिंब भिजणारा; टिकाकारालाही त्याच्यासोबत, थिजायला लावणारा. एक आयडी पाहिजे, जळजळ काढणारा; बीपी सार्‍यांचे वाढवत, बुरख्यामागे लपणारा. एक लेखकु पाहिजे, ललित लिहणारा; गळेपडु खरडी टाकुन, प्रतिसाद मागणारा. एक किरडु पाहिजे, कविता लिहणारा; रुच्चीला गच्ची जोडुन, नवकाव्य प्रसवणारा. एक समीक्षक पाहिजे, पहिल्या वर्गात बसणारा; वृत्त् अन मीटर मोजुन, मार्कशिटे लिहणा
लेखनविषय:

याद्या 5854

झुरणी - लेखणी

Published on गुरुवार, 14/08/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
फक्त तुझ्याचसाठी आजही माझी लेखणी झिजत आहे....... कविता लिहायला बसलो की हातच पुढे सरकत नाही डोळ्यातले अश्रू पाहुन लेखणीतुन शाईसुध्दा सांडत नाही किती माझ्या भावना सांगु, किती आता विचार मांडू तुझ्या आठवणींच्या पावसात पुन्हा पुन्हा किती भिजू येते येते म्हणत तु नेहमीच अशी निघून जातेस स्वप्नातुन जागा करुन पुन्हा मला एकटा पाडतेस आता पुरता थकलो आहे तुझी वाट पाहून तरीसुध्दा तुझ्याच वाटेवर बसलोय डोळे लाऊन माझं काय विचारतेस आता माझी कविताही थकली आहे फक्त तुझ्याचसाठी आजही माझी लेखणी झिजत आहे.......
लेखनविषय:

याद्या 2293
Taxonomy upgrade extras

काळाची गरज

Published on गुरुवार, 14/08/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
एक प्रेयसी पाहिजे, पावसात चिंब भिजणारी; अन मलाही तिच्यासोबत, भिजायला लावणारी. एक प्रेयसी पाहिजे, फुलपाखरांमागे धावणारी; फुलांचे सारे रंग उधळत, झाडांमागे लपणारी. एक प्रेयसी पाहिजे, मुग्धपणे हसणारी; माझ्या बाहूपाशात, अलगद येऊन बसणारी. एक प्रेयसी पाहिजे, कशीही दिसणारी; पण मनाने मात्र, अप्रतिम सुंदर असणारी. एक प्रेयसी पाहिजे, जिवलग मैत्रीण असणारी; आमच्या नाजुक नात्याला, हळुवारपणे जपणारी. एक प्रेयसी पाहिजे, माझ्या भावना जाणणारी; मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी. एक प्रेयसी पाहीजे, प्रेमाला प्रेम समजणारी; सुखा-दुःखात माझ्या, तन्मयतेने साथ देणारी
लेखनविषय:

याद्या 4497
Taxonomy upgrade extras

अवघे पाऊणशे वयमान.

Published on गुरुवार, 14/08/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
समस्त मिसळपावकरानो,वाचक/लेखक मायबापानो,आज अस्मादिकाना पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाली. १४ ऑगस्ट १९३३ हा माझा जन्म दिवस.नंतरचे सगळे वाढदिवस झाले.पण ह्यापुढे कसले वाढदिवस आता राहिले ते फक्त काढदिवस. जन्मापासून दोन वर्षाचा होईपर्यंत, कुकलं बाळ होतो. त्यानंतर सहा वर्षाचा होईपर्यंत अल्लड मुलगा होतो. त्यानंतर अठरा वर्षाचा होईपर्यंत शाळकरी होतो. त्यानंतर बावीस/पंचवीस वर्षाचा होईपर्यंत कॉलेज वीर होतो. त्यानंतर थोडी वर्ष चाकरमानी होतो. त्यानंतर लग्न झाल्यावर हाच मुलाचा/मुलीचा बाप होतो. त्यानंतर मुलं मोठी होऊन शिकायला लागल्यावर गृहस्थ झालो. त्यानंतर पन्नासी उलटल्यावर वयस्कर झालो त्यानंतर साठी उलटल्यावर म्
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 22589