Skip to main content

सहानुभूती आणि प्रत्यक्ष कृती

लेखक लिखाळ यांनी शुक्रवार, 12/12/2008 00:42 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, लहानपणापासूनच आपण परोपकाराय पुण्याय वगैरे ऐकत आलेलो असतो. अगदी पाठ्यपुस्तकांतसुद्धा दुसर्‍याला मदत करुन मोठ्यांच्या कौतुकास पात्र ठरलेल्या मुलांच्या कथा आपल्यावर संस्कार व्हावा म्हणून दिलेल्या असतात. त्यामुळे दुसर्‍याला मदत करायची असते हे कुणी मुद्दामहुन शिकवण्याची गरज असते असे मला तरी कधी वाटले नसते. पण एक प्रसंग अचानक घडला की ज्यामुळे मला शिकवण आणि प्रत्यक्ष कृती यात काय फरक असतो ते समजले. मी शाळकरी असतानाचा प्रसंग आहे. अगदी लहान नव्हतो. दहावीत वगैरे असेन. गणपती उत्सवाच्या वेळी आम्ही काही मित्र गणपतीचे देखावे पाहायला गेलो होतो.

क्युकेनहॉफ: हॉलंड

लेखक कोलबेर यांनी गुरुवार, 11/12/2008 22:12 या दिवशी प्रकाशित केले.
मार्च एप्रिल आणि मे ह्या तीन महिन्यांच्या सुमारास कधी नेदरलँडस/ हॉलंड देशाच्या भेटीवर असाल तर ऍमस्टरडॅम जवळील 'क्युकेनहॉफ' या गावाला भेट दिलीच पाहिजे. वर्षातुन फक्त तीन महिने खुली असणारी ट्युलीपच्या फुलांची अवर्णनिय बाग इथे आहे. गेल्या वर्षी सुदैवाने त्याचसुमारास ऍमस्टरडॅम मध्ये असल्याने ह्या बागेस भेट दिली आणि तिथले सौंदर्य पुरेपुर पाहू शकलो.

सकाळचे मुखपृष्ठ...

लेखक वाटाड्या... यांनी गुरुवार, 11/12/2008 21:09 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी... सकाळी सकाळी सकाळ (इ-सकाळ) उघडला आणि एक धक्का बसला...खाली बघा का ते...हे जरा आमच्यासाठी नवीनच होतं.

सह(न्)जीवन

लेखक विनायक प्रभू यांनी गुरुवार, 11/12/2008 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
मला आज एक मिपासद्स्य सहकुटुंब भेटले.त्यांच्या परवानगीने हे प्रकटन. एक तो होता. एक ती होती. पत्रिका बघुन लग्न झालेले. लग्नाआधी एकमेकांच्या आवडीनिवडी पडताळुन बघायला पूर्ण संधी मिळालेली होती. चार वर्षाचा एक मुलगा होता. दोघांची सारखी भांडणे होत होती. भांडणाला कसलाही विषय चालत असे. न आवडणारी भाजी पासुन ते तो ने कधीतरी घेतलेला पेग. भांडण विकोपाला जायचे. सरतेशेवटी मॅरेज काउंसिलरकडे जायचे ठरले. जाउन सुद्धा आले. काउंसिलर कडे जाउन आल्यावर भांडणे आणखीन वाढली. आधी मराठीत भांडत. आता काऊंसिलरने सांगितलेले इंग्रजी शब्द वापरुन भांडत होते. त्यांच्या बोलण्यात सारखे काउंसिलर हा शब्द परत परत येत होता.

पिचकारी

लेखक सातारकर यांनी गुरुवार, 11/12/2008 15:19 या दिवशी प्रकाशित केले.
उन मी म्हणत होते. त्यात आमची गाड़ी थंड हवेच्या ठिकाणी सोलापुरात थाम्बली होती. चालक वाहक बदलायचे असल्याने गाड़ी अर्धा तास तरी हलणार नव्हती. उन असले तरीही मी सवयिप्रमाणे चहाच घेउन परत गाडित येउन बसलो. अजुन सहा तास प्रवास कसा होणार याचा विचार करत आजूबाजुच्या प्रवाशांकडे पाहत होतो. म्हणजे कोणी चांगले सह्प्रवासी आहेत का ते पाहत होतो. पण असे कोणीही प्रवासी गाडित नव्हते. बाहेर स्थानकावरतिही नव्हते. आमचे नशिबच ख़राब दुसरे काय? गाडिमधे उजव्या बाजुच्या रांगेत सगळ्यात पुढे एक म्हातारबाबा ऐस्पैस बसले होते. त्यांनी एकटयानीच तीन सीट्चे बाकडे अडवले होते.

मदत हवी आहे.

लेखक मिंटी यांनी गुरुवार, 11/12/2008 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर :) मला तुम्हा सगळ्यांची मदत हवी आहे.....मला एका समारंभानिमित्त २५ जणांना मराठी पुस्तक गिफ्ट द्यायची आहेत. तर तुम्ही मला काही चांगल्या मराठी पुस्तकांची नावं सुचवु शकाल का? सगळ्यांना धन्यवाद :)

`अण्णा'न्न दशा!

लेखक आपला अभिजित यांनी गुरुवार, 11/12/2008 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
इतुकेच तूप घेताना वरणावर कळले होते `अन्ना'ने केली सुटका, `अण्णा'ने छळले होते! ती आमटी फुळूकपाणी बोलून बदलली नाही मी डाळ शोधण्या कितीदा, तळ ढवळले होते मेलेल्या आयुष्याचा त्रास गडे विसरूया (पाऊल कधी वासाने `मेशी'कडे वळले होते?) मी वाहिली तेव्हाही अण्णाला शिव्यांची लाखोली मी नाव त्याच्या बापाचे चुपचाप वगळले होते याचेच रडू आले की जमले न मला हसणेही मी रंग त्याच्या कन्येसह कितीक उधळले होते! नुकतीच त्या स्मरणांची जखम भळभळा वाहिली दिसभर मग त्या विचारांनी पोट ढवळले होते घर माझे शोधाया `ब्युरो'त वणवण केली जे `फोन' मिळाले ते केव्हाच केले होते एकटाच त्या रात्री बकाबका जेवत होतो `मधू'सह आकाशात कितीक
Taxonomy upgrade extras

रामदुलारीला राग का आला?

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 11/12/2008 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
रामदुलारीची आणि माझ्या धाकट्या भावाची ओळख योगायोगानेच झाली.माझ्या भावानेच मला ही गोष्ट सांगितली. त्याचं असं झालं,एकदा माझा भाऊ वरसोवा-फौन्टन बसमधे चढायला धाकेकॉलनी बस स्टॉपवर उभा होता.त्याच्या बरोबर दोन चार लोक त्या बसमधे चढले.मागच्या सीटवर जागा भरपूर होती.म्हणून हा ही मागच्या सीटवर बसला.त्याच्या शेजारी एक माणूस बसला होता,तो सारखा चुळबूळ करीत होता.का कुणास ठाऊक त्याला शेजारच्या माणसाचं अंग त्याच्या अंगाला जरा लागलं की तो थोडा अपसेट झाल्या सारखा होऊन आपलं बसणं नीट करायला पाहायचा. भाऊ पुढे म्हणाला, "बसमधे बरीच गर्दी होत राहिली.कंडक्टर जरा वयाने मोठाच असावा.कारण त्याची तिकीटं देण्याची रफ्तार जर