Skip to main content

भरली मिरची

लेखक वल्लरी यांनी शनिवार, 13/12/2008 22:02 या दिवशी प्रकाशित केले.
खरं तर ही रेसीपी शाल्मली पासुन प्रेरीत होऊन केली आहे... पण भेंडी एवजी मिरची वापरली आहे... साहित्य :- मिरची नेहमीच्या नाही थोड्या जाड्या स्वच्छ धुवुन ,उभ्या चिरून चण्याच्या डाळीचं पीठ -पाव वाटी ओले खोबरं - १ वाटी दाण्याचा कुट-४ चमचे धने -जिरे पावडर , गरम मसाला, लाल तिखट, हळद -१ चमचा प्रत्येकी चिंच-गु़ळ कोळ मीठ - चवीनुसार कृती :- वरील सर्व साहित्य एका बाऊल मध्ये घेऊन नीट मिक्स करावे नि उभ्या चिरलेल्या मिरच्यांन मध्ये भरावे. खालील प्रमाणे भरलेल्या मिरच्या दिसतील आता फ्राय पॅन मध्ये थोडे ते

-सकाळवरील "गुगलच्या' जाहिरातींबद्दल निवेदन

लेखक ईसकाळ यांनी शनिवार, 13/12/2008 21:50 या दिवशी प्रकाशित केले.
मागील एक दोन दिवसांत "ई-सकाळ' वाचत असताना जगातील काही भागातील काही वाचकांच्या पाहण्यात आक्षेपार्ह जाहिराती आल्या. मूळच्या "गुगल ऍडसेन्स'मार्फत प्रसिद्‌ध करण्यात येणाऱ्या या जाहिराती आमच्या वाचकांच्या सूचनेनंतर काढून टाकण्याचा निर्णय "ई सकाळ' व्यवस्थापनाने घेतला असून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यात आली आहे. मुळात आक्षेपार्ह जाहिराती प्रसिद्ध करणे ही गोष्ट सकाळ किंवा "ई-सकाळ'च्या जाहितरातविषयक धोरणात नाही असे आम्ही नम्रपणे सांगू इच्छितो. म्हणूनच या सारख्या जाहिराती भविष्यात "ई-सकाळ'वर झळकणार नाहीत या बाबत अधिक काळजी घेण्याचा ई-सकाळचा प्रयत्न राहिल.

मराठीत ही संकेतस्थळे हवीच.

लेखक कलंत्री यांनी शनिवार, 13/12/2008 19:44 या दिवशी प्रकाशित केले.
ज्या काळात महाजालाचा उदय आणि विकास झाला तेंव्हा मराठी अथवा एत्तदेशीय भाषेला इंग्रजीचे ग्रहण लागणार असे सर्वसाधारण लोक आपपासात बोलत असत. हे तंत्रज्ज्ञान इंग्रजीतून आलेले असल्याकारणे तत्कालिन संकेतस्थळावर इंग्रजीचा प्रभाव असणे आणि त्या त्या संकेतस्थळाची भरभराट होणेही स्वाभाविकच होते. मराठी भाषकात एका प्रकारच्या निराशेचा सूर असतांना मात्र काही मराठीप्रेमी आपापल्या परीने मराठीत संकेतस्थळे बनवित होतेच. त्यात मराठीवर्ल्ड.कॉम, मनोगत, उपक्रम आणि मिसळपाव या संकेतस्थळाचा प्रामुख्याने विचार करावा लागेल. ही सर्व संकेतस्थळे बर्‍यापैकी प्रगत असतांनाही यावर मराठीभाषकांचा वावर मात्र तसा कमीच आहे.

शास्त्रीय संगीत

लेखक शशिधर केळकर यांनी शनिवार, 13/12/2008 19:12 या दिवशी प्रकाशित केले.
मागे मि पा वर काही शास्त्रीय संगीताचे धागे मिळाले. आपल्या पैकी कोणाकडे हिराबाई बडोदेकर, सरस्वतीबाई राणे, यांच्या व्यक्तिशः किंवा जुगलबंदी च्या ध्वनिमुद्रणाचे धागे मिळू शकतील का?

पुत्रप्रेमाच्या उमाळ्याचे "बळी'

लेखक अन्वय यांनी शनिवार, 13/12/2008 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
मुख्यमंत्रिपदावरून विलासराव देशमुख आज जाणार, उद्या जाणार अशा अटकळी बांधल्या जात होत्या. बंडखोर नारायण राणेही गुडघ्याला बाशिंग बांधून होते. दिल्ली वाऱ्या, पक्षश्रेष्ठींचे "मतपरिवर्तन', विलासरावांवर यथेच्छ टीका अशी सर्व कारस्थाने राणे करीत होते; पण मुख्यमंत्रिपदाची खुर्ची काही विलासरावांना अंतर देण्यास तयार नव्हती. विलासी "मुद्रे'ची तिला भुरळ पडली होती. अशातच 26 नोव्हेंबरला दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला. हा काही मुंबईतील पहिला हल्ला नव्हता; परंतु या वेळी दहशतवाद्यांनी पंचतारांकित जीवनाला लक्ष्य केले होते. त्यामुळे यापूर्वी झालेल्या बॉंबस्फोटांपेक्षा ही घटना समाजमनावर अधिक तीव्रतेने आदळली.

भरली भेंडी

लेखक शाल्मली यांनी शनिवार, 13/12/2008 14:57 या दिवशी प्रकाशित केले.
भरली भेंडी
साहित्य :- भेंडी - स्वच्छ पुसून, डेखं काढून आणि मधे उभ्या चिरून डाळीचं पीठ - पाव किलो भेंडीसाठी साधारण ३ चमचे जाड/बारीक - रवा अर्धा चमचा कोरडं खोबरं - २ चमचे धने पावडर - अर्धा लहान चमचा जिरे पावडर , गरम मसाला, लाल तिखट, हळद, चाट मसाला - प्रत्येकी १ लहान चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर साखर - अर्धा चमचा मीठ

राष्ट्रीय अंतर्गत सुरक्षा, सोली सोराबजींचे PIL आणि सुप्रीम कोर्टाचा निर्देश

लेखक बहुगुणी यांनी शुक्रवार, 12/12/2008 23:49 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या बातम्यांनुसार वरिष्ठ विधिज्ञ सोली सोराबजी यांनी PIL दाखल करून भविष्यातील अतिरेकी हल्ल्यांना तोंड देण्यासाठी पोलिस व इतर सुरक्षा दलांना आधुनिक शस्त्रास्त्रे पुरवण्यास केंद्र सरकारला भाग पाडण्याविषयी सर्वोच्च न्यायालयाला निर्देश मागितला आहे, आणि त्यावर असा निर्देश सरकारला देऊन न्यायमूर्तींनी एका आठवड्यात सरकार काय उपाययोजना करणार आहे त्याची माहिती देण्यास सांगितले आहे. याचं उत्तर आल्यावर जानेवारीत सर्वोच्च न्यायालय याचा पाठपुरावा करील असं न्यायमूर्तींनी म्हंटलं आहे.

भारनियमन व कॅपॅसिटर

लेखक संजय अभ्यंकर यांनी शुक्रवार, 12/12/2008 22:55 या दिवशी प्रकाशित केले.
काही काळापूर्वी वि.प्र. साहेबांच्या एका धाग्यात प्रतीसाद देताना मी लिहिले होते की "वीज वाचवण्या साठी कॅपॅसिटरचा वापर करा". ह्यावर आनंदजींनी व्यंनी. पाठवून स्पष्टीकरण दिले की कॅपॅसिटरमुळे वीज कंपनीची वीज वाचते. ग्राहकाची नव्हे. ग्राहकाने कॅपॅसिटर लावला की तो, वीज कं. कडून अतिरिक्त वीज खेचत नाही. ही वाचलेली वीज, कंपनी इतरत्र पूरवठा करून, भार नियमन आटोक्यात आणू शकते. आताच त्यांनी आणखी एक व्यनी पाठवला व दै.

शतदा प्रेम करावे

लेखक विनायक पाचलग यांनी शुक्रवार, 12/12/2008 22:03 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रानो माझ्या शुद्ध लेखनाबद्दल येथे बरीच चर्चा झाली. त्यामुळे मी हा माझा पहिला लेख जो मी ३ महिन्यापुर्वी लिहिला होता तो टाइप केलेला होत तो येथे जसाच्या तसा येथे देत आहे. (मी एवढ्यात देणर न्हवतो पण देत आहे.आता शान्त्पणे वाचा आणि प्रतिक्

SAP च्या ABAP/BIW कोर्सबद्दल माहिती हवी आहे.

लेखक चैतन्यकुलकर्णी यांनी शुक्रवार, 12/12/2008 21:47 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मी गेल्या 4 वर्षांपासून ईआरपी मध्ये काम करीत आहे. स्वत:चा व्यवसाय करीत असताना (स्वत:च तयार केलेली सिस्टीम तीन ठिकाणी राबविण्यात आली आहे) आर्थिक गुंतवणूक करण्याची क्षमता नसल्यामुळे सध्या सॅप च्या ABAP/BIW चा कोर्स करण्याविषयी विचार करीत आहे. मला मिळालेल्या माहितीनुसार कोर्सची फी ही रू. 150000/- पेक्षा जास्त आहे(पुण्यात). तरी असा कोर्स केल्यानंतर त्यात नोकरीविषयक संधी व कोर्सविषयक इतर माहिती मिपाकरांना असल्यास द्यावी ही विनंती. ही मोठी गुंतवणूक करणे योग्य आहे का?, पुढे नवीन असताना नोकरीच्या संधी कितपत आहेत/पगार वगैरे, कामाचे स्वरूप इ. धन्यवाद. चैतन्य कुलकर्णी.