ब्यूटी पार्लर अर्थात यौवनफुफाटा
सांग दर्पणा
कशी मी दिसते...
.....
जामानिमा साग्रसंगीत
कौशल्याचे कुवलयापीड
....
मन जळे जीव उरे
काजळावर कृष्ण पुटे
....
हल्लीच फुटलीय कोंडी
अन् परतवलेत आरंभशूर हल्ले
...
फसव्या क्रांतीला झालीय बाधा
यच्चयावतांची विचक्षण त्रेधा
...
पीटिकांना मसाज अन् मलम
पण मनावर कोणते कलम?
...
कोणते सन्मान अन् कोणते पुरस्कार
दिव्या दिव्या दीपत्कार...
Taxonomy upgrade extras
मिसळपाव