Skip to main content

मला मोठं व्हायचय...

लेखक अभिजा यांनी गुरुवार, 01/10/2009 14:38 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याजवळ जे नाही ते प्राप्त करण्याचा माणसाला कोण हव्यास! आपल्याला लहान असताना मोठं होण्याचे वेध लागलेले असतात (आणि मोठं झाल्यावर, लहान!). मोठं होणं किती मज्जेचं असतं. आपण खूप शक्तिमान होतो. आपल्याला जे हवं ते मिळवता येतं. मोठ्या माणसांजवळ खूप पैसे असतात. मग काय? भरपूर गोळ्या-बिस्किटं घ्यायची. परत, मोठ्या माणसांना, कोणी लहान मुलांना ओरडतात तसं ओरडतं का? छे! कधी एकदाचा मोठा होतोय मी! असं म्हणून मी अनेकदा कणसाच्या तु-यांच्या मिश्या नाकाखाली लावून, मोठा झाल्यावर मी कसा दिसेन हे आरश्यात बघून आजमावले आहे. कधी मुद्दाम घरातील मोठ्या लोकांच्या चपला घालून चालून पाहावे.

आम्ही देवाच्या दयेने सुखरूप आहोत

लेखक सुधीर काळे यांनी गुरुवार, 01/10/2009 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
" मिपा"वरील सभासद मित्रांनो, हा लेख असा इथे लिहिणे कायद्यात बसत असेल अशी आशा करतो. एक-एक करत खूप जणांनी खूप आस्थेने माझ्या व माझ्या कुटुंबियांच्या सुरक्षित असल्याबद्दलची चौकशी केली व त्याने मी भारवून गेलो आहे. प्रत्येकाला आतापर्यंत वैयक्तिक उत्तरेही पाठविली, पण शेवटी असं जाहीररीत्या कळवायचं ठरविलं! हा धरणीकंप सुमात्रा बेटाच्या पश्चिमेला "पाडांग"जवळ झाला. रिश्टर स्केलवर ७.९ म्हणजे चांगलाच मोठा होता. जीवित-वित्तहानी खूपच झालेली दिसतेय.

जीवन गेले सरून सरून जाईल ही रात्र

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 01/10/2009 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
(अनुवादीत. गुलझार) अश्रूनी भरले माझे दोन्ही नेत्र भरावी नीज कशी कळेना मात्र स्वपनांच्या छाया भरलेल्या नयनी अपुल्या रात्रभर गैरांच्या होती दिनी अश्रूनी भरले माझे दोन्ही नेत्र भरावी नीज कशी कळेना मात्र मिथ्या तुझ्या वचने वर्षे जाती व्यतीत जीवन गेले सरून सरून जाईल ही रात्र अश्रूनी भरले माझे दोन्ही नेत्र भरावी नीज कशी कळेना मात्र कशी सामावू नीज माझ्या नयनी दोन्ही माझे नेत्र भरले त्या अश्रूनी श्रीकृष्ण सामंत
काव्यरस

परागंदा

लेखक मिसळभोक्ता यांनी गुरुवार, 01/10/2009 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
(हे विडंबन नाही. पण प्रेरणा धन्याशेठची.) आज का आलो इथे ? थांबली पत्रे इथून माझ्या नावावर येणारी. पत्ता बदलवला तरी "फॉरवर्डींग इज नॉट डन टू अ‍ॅड्रेसेस बियाँड इंडिया" पोस्ट ऑफिसाने सांगितले वाटले होते, घर स्वच्छ केले, सगळे सामान 'शिप' केले. पण, अरेच्चा!
काव्यरस

एन आर आय बँकिंग (NRI Banking)

लेखक JAGOMOHANPYARE यांनी गुरुवार, 01/10/2009 09:05 या दिवशी प्रकाशित केले.
एन आर आय बँकिंग बद्दल मला काही शंका आहेत.. १. NRE आणि NRO अकाउंटमध्ये काय फरक असतो ? २. परदेशातून पैसे आपल्याच खात्यावर जमा करण्यासाठी NRE किंवा NRO अकाउंटमध्येच ट्रान्स्फर करणे आवश्यक असते का? ३. आपल्या पूर्वी ओपन केलेल्या सेविंग अकाउंटमध्ये ( जे NRE/ NRO नाही) आपण परदेशातून पैसे डायरेक्ट ट्रान्स्फर करु शकतो का? ४. मग जर नॉर्मल अकाउंटमध्ये पैसे डायरेक्ट ट्रान्स्फर करता येतात, तर NRE/ NRO अकाउंट असण्यात विशेष फायदा काय आहे? मी विविध बॅन्कांच्या साइट्स पाहिल्या. पण त्यावर अकाउंट ओपन कसे करावे, मिनिमम बॅलन्स, अशी माहिती आहे... मला या प्रश्नांबाबत कोणी मार्गदर्शन करू शकेल का?

बोलत होता मोबाईलवर

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 01/10/2009 08:59 या दिवशी प्रकाशित केले.
बोलत होता मोबाईलवर
आरे त्या देवळात करुंन र्‍ह्यायलाय? इकडे माझ्याकडे सिग्नलवर ये. लई ट्रापीक आसतीया. काय नाय, गाडीला कपडा मारायचा आन हात पुढं करायचा, १०-२० ची नोट मिळती बघ लगेच. - सिग्नलवरचा एक भिकारी दुसर्‍याला सांगत होता मोबाईलवर. "हाँ, शाम को दुकानपे आता हूं, कल के भंगार का पैसा तैयार रखना", असे भंगारवाला हातगाडी चालवता चालवता बोलत होता मोबाईलवर. आर ए मारुत्या, त्या खालच्या शिमीटाच्या गोण्या निट वरती लाव आन त्या बल्या आन फाळके निट रचून ठेव. आन कायरे भाडखाऊ, सेंट्रींग प्लेटांना लावायला ऑयल आनल नाय का रे, तुझ्यायला?

काहीतरी राहिले आहे इथे

लेखक धनंजय यांनी गुरुवार, 01/10/2009 02:07 या दिवशी प्रकाशित केले.
काहीतरी राहिले आहे इथे
असाच आलोय इथवर. येताएत अजून माझी पत्रे या पत्त्यावर...? हो, काही मिळाली वरचा पत्ता बदलून पोस्टात परतवलेली... पण राहिले होते कपाटात, मला वाटते, माझे काही कपडे. नाही मागवलेत फोनवरून, म्हटले - मीच येऊन शोधावेत. नाहीत सापडले. अरेच्चा! आहे की बोचके इथे बांधूनही ठेवले.
.
ती आतली खोली माझ्या आठवणीतली तशी नाही राहिली... हो, दिवाणखाना आहे तसाच...
काव्यरस

फक्त तुझ्यासाठी ...(यावेळी कविता)

लेखक प्रभो यांनी बुधवार, 30/09/2009 20:29 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना : काल तीला भेटलो...ती धड हो म्हणत नाही....तिच्यासाठी ही कविता.... तू कुठे गेलीस सखे, मला सोडून या एकांतात | तुजवाचून सर्व रूक्ष आहे, माझ्या जिवनाच्या वाळवंटात || ऐक माझ्या मनातून, तुझचं नाव येतंय | तू नसताना माझ्या प्रेमाचं शीड, उगाच हेलकावे खातंय || प्रेमाच्या या समुद्रात, उसळतायत उंच उंच लाटा | जीव घेतात गं तुझ्या या, कपाळावर सोडलेल्या बटा || नयन तुझे गहिरे, जणू मदनाचे बाण | तुझ्या एका कटाक्षापायी, येतो कंठाशी प्राण || तुझ्या डोळ्यातील काजळ, दिसते जणू चंद्रकोर | तुझ्या दर्शनासाठी, आसुसलेला गं मी चकोर || आसुसलेल्या धरतीची, धग शमवतो वरूणराजा | तुला जिवनसाथी बनवून, वाजवायचाय मल
काव्यरस

मार्केट १७००० च्यावर

लेखक दशानन यांनी बुधवार, 30/09/2009 18:38 या दिवशी प्रकाशित केले.
आज मार्केट १७००० च्यावर गेले.... अनेक ज्योतीषी / चॅनेलवाले बोंबलत होते की मार्केट ह्या महिन्यात नक्की पडणार पण.. असल्या लोकांच्या नाकावर टिच्चुन मार्केट ने भरारी मारली... मज्जा आली ! आता काही प्रश्न ! ह्या ज्योतिष्यांचे काय करावे ? ह्या टिव्ही वाल्यांचे काय करावे ? जरा काही झाले की मार्केट पडणार... तो मंगळ वाकडा झाला.. तो राहु कुठे तरी घुसला तर म्हणे वाट लावणार... तरी मार्केट वर आलेच ना ? भले आता खाली जाऊ दे.. पण खाली जाणे गरजचे असते कचरा साफ होतो त्याला करेक्शन असे म्हणतात... कारण भक्कम पाया असला की इमारत चांगली उभी राहते छोटी मोठी वादळे मग काही करु शकणार नाहीत वाकडे त्याचे....

मन्ना डे

लेखक विदेश यांनी बुधवार, 30/09/2009 16:47 या दिवशी प्रकाशित केले.
३,५००च्या वर गाणी गाणा-या मन्ना डे यांना २००७ सालचा"दादासाहेब फाळके" पुरस्कार जाहीर झाला आहे. मन्ना डे यांनी गाईलेली अवीट गोडीची गाणी सर्व रसिकांना आता आठवणे , अपरिहार्य आहे ! आपणा सर्वांतर्फे मन्ना डे यांचे मन:पूर्वक अभिनंदन !