बघता बघता
बघता बघता दिवस सरतात ,लहानाचे मोठे होतो
जीवनाच्या वाटेवर मग सुंदर एक क्षण येतो
नवे पर्व ,नवी नाती सगळा नवं नवं असतं
कुणीतरी अश्यावेळी सोबत हवं हवं असतं
क्षितीजामागे सांजवेळी जग अगदी छान दिसतं
स्वप्नातल्या राज्यात मग दोघांचं गाव दिसतं
सूर मग जुळून येतात, स्वप्नवत होतो आभास
हृदयाला दोघांच्या पुरतो एकच श्वास
एका प्लेट मध्ये मग भेळ पुरी तिखट असतानाही गोड लागते
ती जवळ असताना ,पाण्याविनाच तहान भागते
ती च्या ती मध्ये मग माझ्यातला मी असतो
तिच्यातल्या तिला पाहताना, माझा मीच हरवून बसतो
काव्यरस
मिसळपाव