Skip to main content

शेयर बाजारच्या खरेदी विक्री करिता मनीवर्क्स्४मी ह्याची मदत घ्यावी का.

लेखक सुकामेवा यांनी बुधवार, 06/10/2010 17:11 या दिवशी प्रकाशित केले.
कालच मला एक विरोपपत्र आले होते, म्हणून सहज मी moneyworks4me.com ह्या साईट वर जाऊन त्यांचा डेमो पाहिला. कृपया तुम्ही सुद्धा डेमो अथवा तुमच्या अनुभवावरून सांगू शकता याचा उपयोग आहे का नाही ते. तुम्हाला काय वाटत ४००० रु. भरून ह्याच्या सुविधा घ्यावा का?

कधी कधी

लेखक समीरसूर यांनी बुधवार, 06/10/2010 15:33 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी आयुष्यातल्या दिवसांचे गणित कळतच नाही. कधी कधी सगळं कसं एकाच धाग्यात गुंफल्यासारखं घडत असतं किंवा कधी कधी काहीच घडत नाही बरेच दिवस; नुसतेच दिवस पळत असतात. सिनेमात दाखवतात त्याप्रमाणे कॅलेंडरची पाने बदलावीत त्याप्रमाणे दिवस उडत असतात. देवासमोरच्या आरतीच्या ताटात कापराच्या वड्या भर्रभर्र जळाव्यात आणि काही क्षणांतच तिथे फक्त काळपट काजळी रहावी किंवा गॅसवर ठेवलेल्या कढईतले पाण्याचे थेंब काही क्षणातच नाहीसे व्हावेत तसं काहीतरी आयुष्यातल्या दिवसांचं होतं कधी कधी. कधी कधी काही दिवस उगीच सगळं बिघडत जातं. अगदी साध्या-साध्या गोष्टी डोक्याला ताप देतात.

तुझ्या उंबऱ्याची माती

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी बुधवार, 06/10/2010 14:19 या दिवशी प्रकाशित केले.
तसं पाहिलं तर सत्शील व्यक्तिंनी उंबरा ओलांडू नये असे म्हणतात. त्यामानाने तुझा उंबरा फारच मोलाचा. जणू एखादी लक्ष्मणरेखाच. ती ओलांडली की माणसाने सद्गुणांना सोडले असे मानतात. वर्षअखेरीस तुझ्या उंबऱ्‍याच्या अलिकडे अगणित सद्गुणांची भली मोठी रास साठलेली असते. ती आम्हां 'अ'शीलवंतांना खुणावते. त्या राशीने भारीत झालेली मूठभर माती जरी मिळाली तरी उंबऱ्‍या पलिकडे जाऊन केलेल्या कुकर्मांचे प्रायश्चित्त मिळाल्यासारखे वाटते. ती दिव्य मृत्तिका आम्ही ढोल ताशे बडवित वाजत गाजत तुझ्याच वस्तीतून आमच्या ग्रीनलाईटच्या दुनियेत आणतो.

टेकडीच्या माथ्यावर

लेखक दत्ता काळे यांनी बुधवार, 06/10/2010 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
मी महात्मा सोसायटीच्या मागच्या टेकडीवर व्यायामाच्या निमित्ताने फिरायला जात असे. हल्लीही जातो पण दोन वर्षापूर्वी जसा सलग दोन वर्षे नित्यनियमाने जात असे तसे आता काही राहीले नाही. पण अजूनही टेकडीवर कधी गेलोच तर पूर्वीचाच ताजवा जाणवतो. टेकडीवरच्या कितीक मजेशीर आणि अन्य प्रसंगामुळे टेकडीवर फिरायला जाणे हि कल्पना दिवाळीच्या सणाइतकी मनाला प्रसन्नता देणारी असते. पश्चिम ते पूर्व असा विस्तार असणार्‍या ह्या टेकडीचे एक टोक पश्चिमेकडे मुंबै-बंगळूर हायवेकडे तर पूर्वेचे गांधीभवन-डहाणूकर कॉलनी भागाला वळसा घालून कर्व्यांच्या कॉलेजकडे उतरते. टेकडीवर मी पश्चिमेच्या दिशेने न जाता पूर्वेच्या दिशेने जातो.

हनुमानाचा शाप व त्यावर उतारा

लेखक रणजित चितळे यांनी बुधवार, 06/10/2010 11:16 या दिवशी प्रकाशित केले.
अंतिम भाग गुरवारी (७ आक्टोबर) ला प्रसिद्ध ब्रिटीश सेनानी फिल्ड मार्शल फिलिप चेटवुडच्या शब्दात थोडा बदल करुन राष्ट्रव्रती कसा असावा हे थोडक्यात सांगतो - आपल्या राष्ट्राची सुरक्षा, राष्ट्राचा सन्मान आणि राष्ट्राचे कल्याण - नेहमीच सगळ्यात आधी. तदनंतर आपल्या परिवाराचा सन्मान, परिवाराचे कल्याण आणि परिवाराची सोय. स्वतःची सोय, स्वतःचे कल्याण व स्वतःची - सुरक्षा शेवटी, नेहमीच शेवटी. हनुमानाचा शाप व त्यावर उतारा – पहील्या भागात आपण प्रामुख्याने खालील निर्देशित मुद्द्यांवर चर्चा केली.

भेट

लेखक अनिवासि यांनी बुधवार, 06/10/2010 03:26 या दिवशी प्रकाशित केले.
मी दिवाळीसाठी भारतात येणार आहे. पुण्यात जास्त वेळ आणि मग मुम्बई वगेरे. साधारण २-३ महीने आहे. मिपाकराना भेटायला आवडेल. खरडवहीत नीरोप ठेवावा.

मला हे प्रश्न पडतात

लेखक शुचि यांनी बुधवार, 06/10/2010 01:27 या दिवशी प्रकाशित केले.
मॉंटेसरीत असताना होळीच्या भूतांना घाबरले होते. तोंडे रंगवलेले, मुखवटे घातलेले लोक, लहान मुलं पाहून मागे मागे जात गेले अन खरोखरच तारेच्या काटेरी कुंपणावर पडले. बरच ओरखडलं होतं, धनुर्वाताची लस टोचून घ्यावी लागली होती. तेव्हा कितीही सांगीतलं असतं की ती भूतं खोटी असतात तरी बालमनाला पटलं नसतं. त्या क्षणापुरता त्यांची विद्रूप, भडक रूपं हेच वास्तव होतं. ___ भविष्यविषयक चिंता , असुरक्षितता मग ती वित्तीय असो वा आरोग्यविषयक या भूतांसारख्याच असतात का? आपलं उरलं सुरलं मानसिक स्वास्थ्य नष्ट करणार्‍या.