फायनल : विघ्नसंतोषीपणा (?)
वर्ल्डकपची फायनल. भारताच्या इनिंगला पुर्ण वेळ मी शब्दशः "फिंगर्स क्रॉस" करुन बसलेलो होतो. धोनीचा सिक्सर गेला नी मी फुटलो.. काय करावं ते कळेना. आरोळ्या, बोंबा, शिट्या सगळं झालं.. टिव्हीवर दिसणारा जल्लोष पहात बसलो जवळजवळ रात्री २ पर्यंत, आणि हे करतांनाच फोन, मेसेजेस सुरु होतं...
दुसर्या दिवशी सकाळी मोबाईल पाहीला. त्यात एक मेसेज होता, "अरे, मॅच फिक्स्ड होती. आम्हाला आधीच सगळं (म्हणजे स्कोर, विकेट्स वगैरे) माहीत होतं." आणि सोबत कोणाला काय मिळालयं त्याचं वर्णन...
मी चमकलो. कारण मेसेज करणारी व्यक्ती बेजबाबदार, उगाच काहीतरी बोलणारी नाहीय. विघ्नसंतोषी पण नाही.
मिसळपाव