Skip to main content

बॅचलर्स भाजणीचे वडे

लेखक सूड यांनी बुधवार, 13/04/2011 08:51 या दिवशी प्रकाशित केले.
कुंदन यांचा कट्ट्यावरचा उतारा, स्पा यांची भेळ वैगरे पाकृ पाहून आमचे (पक्षी: माझे) हात शिवशिवू लागले. त्यात स्पाने तर कहरच केला, माणसाने फेमस व्हावं पण किती?? त्यांनी आयोजित केलेला कट्टा अगदी सुफळ संपूर्ण झाला हे पाहून आमची जळजळ आणिकच वाढली. कट्टा केला तोही पुरेपूर कोल्हापूरमध्ये ?? यावरून आम्ही गणित बांधले की हा माणूस कानामागून येऊन भलताच 'तिखट' होऊ बघतो आहे आणि मग पूर्वी जसं असुर, दैत्य .....नको आपण मराठीत डेमॉन्स म्हणूया. हां, तर पूर्वी जसं या डेमॉन्स मंडळीनी तप सुरु केलं की, इंद्राला....म्हणजे देवराज इंद्रा, पवारा'ज इंद्रा नाही.

ये आकारा.......

लेखक पारुबाई यांनी बुधवार, 13/04/2011 07:59 या दिवशी प्रकाशित केले.
“अनिता ए अनिता, अग बाल्कनीमध्ये काय करते आहेस एवढा वेळ? चल लवकर.” “आले, आले” “चल आता निघू या.तुला डॉक्टरकडे नेवून आणून मला ऑफिसला जायचय.” “अरे, आपल्या बिल्डिंगच्या मागे जी रिकामी जागा होती ना तिथे बहुधा बांधकाम सुरु होणार आहे असे वाटतंय “ “तरीच मागच्या महिन्यात एकदम तिथे काँग्रेस गवत काढून टाकणे चालू होते. तारेचे कुंपण घालत होते.” “काय म्हणतील रे डॉक्टर? आपल्याला हवी ती गोड बातमी देतील?” “देतील का काय? देणारच.” …… …… …… “हॅलो …. सासूबाई, मी अजय बोलतो आहे. एक चांगली बातमी सांगायची आहे. तुम्ही आजी होणार आहात.” “अरे वा! आनंदाची बातमी आहे कि ही. कशी आहे अनिता? कितवा महिना आहे?

नवीन सिनेमा "तार्‍यांचे बेट"

लेखक भडकमकर मास्तर यांनी बुधवार, 13/04/2011 07:26 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येक जण कुटुंबासाठी कष्ट करत असतो, त्यांची स्वप्नं पूर्ण व्हावीत म्हणून आटापिटा करतो पण हे स्वप्न जर आर्थिक ताकदीच्या पलिकडलं असेल तर? या आठवड्यात रीलीज होणार्‍या " तार्‍यांचे बेट" नावाच्या सिनेमाची ही साधी सरळ गोष्ट.

चांदण्यांस मिठी मारतांना

लेखक निनाव यांनी बुधवार, 13/04/2011 01:01 या दिवशी प्रकाशित केले.
चांदण्यांस मिठी मारतांना चंद्रास गोड का वाटत असेल? त्यास आलिंगनात भरतांना रात्रीस मोह का आवरत असेल? दिवस उजाडुच नये कधी वाटत तिला ही असेल मोहक चंद्रा च्या पाशातुन सुटतांना जीव तारकांचा का आवळत असेल? चंद्रा च्या कुशी खालून अलगद पदर खेचून पहाटे आंथरुणातून उतरत रात्र जेंव्हा असेल सुटलेल्या केसांमधुनी लाज आवरत पदरा खालील मन तिचे का बांवरत नसेल? मधु-चंद्र काय असावे चंद्रास का ते कळत असेल? रोजच असते रात्र त्याचीच मोह मिलना चे का उमगत असेल? चांदण्यांस मिठी मारतांना चंद्रास गोड का वाटत असेल? चंद्रास आलिंगनात भरतांना रात्रीस मोह का आवरत असेल?
काव्यरस

प्रतिबिंब

लेखक सूर्य यांनी मंगळवार, 12/04/2011 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
खुप दिवसानी मिपावर कलादालनात फेरफटका मारतोय. इतके दिवस वाचनमात्रच रहावे लागले होते. आता देव्हार्‍यात ठेवलेला कॅमेरा बाहेर काढायचा विचार आहे व कलादालनात वरचे वर येण्याचा विचार आहे. हे चित्र जुनेच आहे. परंतु कुठे शेअर केले नव्हते. नवीन चित्रे लवकरच टाकेन.

न्याय तुमचा खास आहे

लेखक डॉ अशोक कुलकर्णी यांनी मंगळवार, 12/04/2011 20:19 या दिवशी प्रकाशित केले.
............ न्याय तुमचा खास आहे तक्रार तुमची, पोलीस तुम्ही, न्याय तुमचा खास आहे सीता असो वा द्रौपदी, नशिबात अमुच्या वनवास आहे. आले किती, गेले किती, यात सारे गर्क झाले बागेतल्या फुलांनाही, येथे गणिताचा तास आहे. कोण वेडा, कोण नाही, वेडेच ठरविती सर्व काही लाट आहे बारकी पण, मज सुनामीचा भास आहे. भाट यांचे गाऊन गेले, ढोल यांचे बडवून झाले बंद करतो कान माझा, इतुकाच मजला त्रास आहे. पेरले मी, राखले मी.

बखर अंतकाळाची - कालातीत भारतीय जाणीवेचा रसाळ आविष्कार

लेखक चिंतातुर जंतू यांनी मंगळवार, 12/04/2011 19:44 या दिवशी प्रकाशित केले.
अंताजीच्या बखरीच्या पहिल्या भागाविषयी इथे वाचता येईल. प्लासीच्या लढाईनं संपवलेल्या ‘अंताजीच्या बखरी’चा दुसरा भाग काही वर्षांनंतर सुरु होतो. मधल्या काळात पानिपत होऊन गेलेलं आहे; अंताजी पंधरा-वीस वर्षांनी म्हातारा (म्हणजे चाळीशी गाठण्याच्या बेतातला, मध्यमवयीन) झालेला आहे. अंताजीच्या गावच्या जमिनीच्या बखेड्याच्या पहिल्या कहाणीपासूनच मराठेशाहीच्या मधल्या काळातल्या प्रवासाचा अंदाज येतो.