व्यवसाय सुरू करण्याआधी
भारतात व्यवसाय सुरू करण्यासाठी काही सरकारी नोंदण्या आवश्यक असतात. मला आजवर सापडलेल्या नोंदण्या पुढे देत आहे. मात्र या शिवायही अजून काही महत्त्वाच्या नोंदण्या असू शकतात. नवीन व्यवसाय कसा सुरू करावा ही चर्चा येथे व्हावी ही अपेक्षा. खालील माहिती मध्यम व्यवसाय सुरू करण्यासाठी उपयोगी पडेल असे वाटते.
१. पॅन नंबर - कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे पर्मनंट अकाऊंट नंबर असणे आवश्यक आहे. हा नंबर युनिट ऑनलाईन अप्लाय करता येतो. मात्र कागदपत्रे छाननीसाठी प्रत्यक्ष जावेच लागते. यासाठी बहुदा युनिट ट्रस्टच्या शाखेत जाता येते.
मिसळपाव