Skip to main content

सक्त मजुरी

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 01/09/2011 22:45 या दिवशी प्रकाशित केले.
जन्म ठेप/सक्त मजुरीची जास्तित जास्त शिक्षा १४ वर्षे असते असे ऐकुन आहे..हे खरे आहे का? जास्तित जास्त किति वर्षे शिक्षा होवु शकते?? अशी जास्तित जास्त वर्षे शिक्षा भोगल्याची उदाहरणे आहेत का> सक्त मजुरी म्हणजे नेमके काय?? अश्या कैद्याना तुरुंगातच काम दिले जाते का? असेल तर काय स्वरुपाचे??व त्याला मोबदला दिला जातो का? व किति?? नेमके काय काम असते? जन्म ठेप व सक्त मजुरी यात नेमका फरक काय आहे? आज महा नगरे व शहरे व जिल्हा यांची स्थिति पाहिली तर शहरातल्या बर्याच भागात घाणीचे साम्राज्य असते.. सक्त मजुरीची शिक्षा झालेल्यांना सरकार सफाइ कामगार म्हणुन वापरु शकते का?

शाबासकी आणि निर्भत्सना

लेखक सुधीर काळे यांनी गुरुवार, 01/09/2011 22:28 या दिवशी प्रकाशित केले.
शाबासकी आणि निर्भत्सना! (कामरान शफी या स्तंभलेखकाने लिहिलेला हा लेख काराचीहून प्रसिद्ध होणार्‍या 'डॉन' या वृत्तपत्रात २३ ऑगस्ट रोजी प्रकाशित झाला. तो मला खूप आवडला म्हणून तो लेख मी शफीसाहेबांची आणि 'डॉन'ची रीतसर परवानगी घेऊन इथे अनुवादित केलेला आहे. शफीसाहेबांना या लेखाला आलेल्या आपणा सर्वांच्या प्रतिसादाबद्दल खूप उत्सुकता आहे.)

अण्णांच्या उपोषणाच फलीत.

लेखक chipatakhdumdum यांनी गुरुवार, 01/09/2011 22:12 या दिवशी प्रकाशित केले.
अण्णांच्या उपोषणाच फलीत काय आहे, हे खूप विचार करुन सुध्धा कळत नाहीए. अल्प स्वल्प बुध्दीला अस वाटायला लागल आहे की ' बादशहाचा पोपट आणि बिरबल ' आणि ' राजा, त्याचा सोन्याचा अंगरखा आणि लहान मुलगा ' या दोन गोष्टींच तात्पर्य आणि 'अण्णांच उपोषण ' यांच्यामध्ये काही तरी समान धागा आहे. तुम्हाला काय वाटत ?

(राया मला अनफ्रेंड करू नका)

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी गुरुवार, 01/09/2011 21:27 या दिवशी प्रकाशित केले.
एका आधुनिकोत्तर तरुणीची ही दारूण फेसबुककथा आहे. तरुण अन् तरुणी पूर्वी प्रत्यक्ष बागेत वगैरे भेटत. आजकालच्या व्हर्च्युअल विश्वात ते फेसबुकाच्या फार्मव्हिलमध्ये भेटतात. अशाच एका तरुणीला, आपल्या कवितेच्या नायिकेला एक तरुण भेटला. वॉल फोटो वगैरे तपासायचे कांदेपोहे झाल्यानंतर रीतसर फ्रेंड रिक्वेस्ट झाली. एकमेकांना त्यांनी बघितलं नव्हतं. तरी वॉलपोस्टा लाइक करून, सारख्याच कॉजेसना सपोर्ट करून, फार्मव्हिलमध्ये एकमेकांच्या झाडांना पाणी घालून त्यांची मैत्री वाढली. तिने त्याला आपल्या अकाउंटचा पासवर्ड दिल्यानंतर मात्र चित्र पालटलं.
काव्यरस

वाचणार्‍याची रोजनिशी

लेखक नंदन यांनी गुरुवार, 01/09/2011 12:54 या दिवशी प्रकाशित केले.
सॉमरसेट मॉमच्या 'द बुक बॅग' ह्या कथेत वाचनाबद्दल सुरेख भाष्य आहे - 'Some people read for instruction, which is praiseworthy and some for pleasure, which is innocent; but not a few read from habit, and I suppose that this is neither innocent or praiseworthy. Of that lamentable company am I.' वाचनाच्या छंदाचं हळूहळू सवयीत - किंवा खरं तर व्यसनात - रूपांतर कसं होत जातं आणि ज्ञानवर्धन किंवा रंजन हे हेतू कसे मागे पडत जातात यावर भाष्य करणारे हे उद्गार. अशा काही मोजक्या, भाग्यवान वाचकांचे पुस्तकांबद्दलचे किंवा एकंदरीतच साहित्यव्यवहाराविषयीचे अनुभव वाचणं, ही देखील एक पर्वणी असते.

गणपतीची आरती

लेखक गंगाधर मुटे यांनी गुरुवार, 01/09/2011 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
Ganesh गणपतीची आरती जय गणेश, श्री गणेश, नमो श्रीगणेशा आरती स्वीकार करा, वंदितो परेशा ॥धृ॥ वक्रतुंड,तिलकउटी, दंत कर्ण न्यारी कमळ,शंख,फ़रशी करी, मूषावरी स्वारी खंड तिन्ही मुकुटमणी, समर्था नरेशा ॥१॥ पर्णजुडी हरळीची, रुची मोदकाची नारिकेल कलशाला, आम्र तोरणाची रिद्धिसिद्धी पायावरी लोळती हमेशा ॥२॥ तूच बाप,माय तुचि, आम्ही तुझी लेक एक आस जीवनास, पंथ दावी नेक अभयहस्त पाठीवरी, ठेवुनि सर्वेशा ॥३॥ गंगाधर मुटे ................................................

मिपाला चौथ्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा

लेखक क्लिंटन यांनी गुरुवार, 01/09/2011 09:09 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, आज गणेश चतुर्थी! आज आपलं लाडकं मिपा (तिथीने) चार वर्षाचं झालं. गेल्या चार वर्षात मिपावर अनेकविध विषयांवर दर्जेदार चर्चा वाचता आल्या, त्यात भागही घेता आला. तसेच मिपामुळे अनेक नव्या ओळखी झाल्या, मित्रपरिवार वाढला. आता तर मिपाशिवाय पूर्वी कसे राहत होतो असाच प्रश्न पडू लागला आहे. असे हे उत्तम, दर्जेदार आणि सुंदर संकेतस्थळ चालू करून माझ्यासारख्या अनेकांना मायमराठीतून इतरांबरोबर संवाद साधायची संधी दिल्याबद्दल तात्या आणि नीलकांतचे आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत.

काय गुण सांगू माझ्या सालीचे

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 01/09/2011 04:46 या दिवशी प्रकाशित केले.
काय गुण सांगू माझ्या सालीचे
माझ्या सालीचे काय गुण सांगू माझ्या सालीचे वांधे केले वांधे जगायचे सालीने केले माझे वांधे ||धृ|| ती घरात येते तर एकदम जसे चक्रीवादळ येते भाऊजी भाऊजी म्हणत ती माझ्या मागे फिरत असते नटते थटते लाजत मुरडते मी जरा बोललो तर लाजून आखडते भरल्या घरात शोभतात का तिला हे असले धंदे? वांधे केले वांधे जगायचे सालीने केले माझे वांधे ||१|| एकदा मी ऑफीसातून घरी लवकर गेलो ती एकटीच घरी असल्याने चिंतेत पडलो तेव्हढ्यात तिने विचारले भाऊजी इकडे जरा येणार का? कॉलेजच्या नाटकातला प्र