सक्त मजुरी
जन्म ठेप/सक्त मजुरीची जास्तित जास्त शिक्षा १४ वर्षे असते असे ऐकुन आहे..हे खरे आहे का?
जास्तित जास्त किति वर्षे शिक्षा होवु शकते??
अशी जास्तित जास्त वर्षे शिक्षा भोगल्याची उदाहरणे आहेत का>
सक्त मजुरी म्हणजे नेमके काय??
अश्या कैद्याना तुरुंगातच काम दिले जाते का? असेल तर काय स्वरुपाचे??व त्याला मोबदला दिला जातो का? व किति??
नेमके काय काम असते?
जन्म ठेप व सक्त मजुरी यात नेमका फरक काय आहे?
आज महा नगरे व शहरे व जिल्हा यांची स्थिति पाहिली तर शहरातल्या बर्याच भागात घाणीचे साम्राज्य असते..
सक्त मजुरीची शिक्षा झालेल्यांना सरकार सफाइ कामगार म्हणुन वापरु शकते का?
मिसळपाव
गणपतीची आरती
जय गणेश, श्री गणेश, नमो श्रीगणेशा
आरती स्वीकार करा, वंदितो परेशा ॥धृ॥
वक्रतुंड,तिलकउटी, दंत कर्ण न्यारी
कमळ,शंख,फ़रशी करी, मूषावरी स्वारी
खंड तिन्ही मुकुटमणी, समर्था नरेशा ॥१॥
पर्णजुडी हरळीची, रुची मोदकाची
नारिकेल कलशाला, आम्र तोरणाची
रिद्धिसिद्धी पायावरी लोळती हमेशा ॥२॥
तूच बाप,माय तुचि, आम्ही तुझी लेक
एक आस जीवनास, पंथ दावी नेक
अभयहस्त पाठीवरी, ठेवुनि सर्वेशा ॥३॥
गंगाधर मुटे
................................................