Skip to main content

तिसरी कसम

लेखक नीलकंठ देशमुख यांनी शुक्रवार, 13/05/2022 09:51 या दिवशी प्रकाशित केले.
तिसरी कसम "गळाकाटू वकी$$$$ल '',शिपायाने केलेली पुकार ऐकून डायसवर बसलेल्या काटे एकदम चमकले. काय आडनावं आहे!चित्र विचित्र आडनावं सगळीकडेच असतात.पण इकडे विदर्भात वेगळीच त-हा आहे. गिडमिडे,किडमिडे,बुडबुडे,लुकतुके,किरकिरे, एकवेळ ठीक.पण मानकापे,नाकमोडे,गळाकाटू,हाततोडे, पायमोडे अशी,डोक्यापासून पायापर्यंत शरीराचे विविध अवयवांचा छेद करणारी आडनावे,भयंकरच आहेत.रोज नववीन ऐकायला मिळतात.आडनावांची निर्मिती या विषयावर संशोधन करून पुस्तक लिहीता येईल असा क्षणिक विचार त्यांच्या मनात आला.त्यांना हसू आले .पण समोरच्या फायलीत तोड घालून मोठ्या कष्टाने त्यांनी ते लपवले.साहेब आडनावाला हसले हे वकीलांना कळले तर भानगड व्ह

शशक'२०२२ - टेलिपॅथी

लेखक साहित्य संपादक यांनी गुरुवार, 12/05/2022 17:23 या दिवशी प्रकाशित केले.
“जेवायला वाढ, खूप भूक लागलीय.” तो घरात शिरत म्हणाला. दिवाळीचा पाडवा,ती हरखली, किंचीत लाजली सुद्धा.काय हो अचानक कसे काय?आणी ते सुद्धा रात्रीच्या साडेअकरा वाजता.तो नुसताच गालात हसला.झोपलेल्या मुलांकडे प्रेमाचा एक कटाक्ष टाकला. आई बाबा तुम्ही येणार नाही म्हणून तुमच्या बहिणीकडे गेलेत. त्याच्या अचानक येण्याने तारांबळ उडली होती.तोडंच्या टकळी बरोबरच तीने पाट रांगोळी करत ताट वाढायला घेतल॔. आपल्याच नादात म्हणाली, आहो हात पाय धुऊन घ्या. तो गेला. . . . . . . मुलगा तीला हालवत म्हणाला, "ए आये,दारावरची घंटी वाजतीय". डोळे चोळतच तीने दरवाजा उघडला,बघते तर काय ?

शशक'२०२२ - समाजप्रबोधनात अंधश्रद्धा

लेखक साहित्य संपादक यांनी गुरुवार, 12/05/2022 17:19 या दिवशी प्रकाशित केले.
समाजप्रबोधन करणार्या साहेबांचं जोरात भाषण चालू होतं. आज साहेब धर्मावर बोलू लागले. रूढी, परंपरा, पूजा-अर्चा, देव सगळं खोटं आहे, आपण या अंधश्रद्धांमधून बाहेर पडलं पाहिजे. साहेबांच्या प्रत्येक वाक्याला टाळ्या आणि शिट्ट्यांचा पाऊस पडत होता. बसलेले श्रोते आणि मंचावरचे सर्व लोक आज साहेबांच्या या नव्या अवताराकडे आश्चर्याने बघत होते. साहेब जोषात होते. तेवढ्यात एक बाई मंचापाशी येऊन उभी राहिली. तिने साहेबांना हातही केला. साहेबांचं लक्षच नाही. मंचावर उपस्थित सहकार्यांनी बाईंना वरती बोलावलं. साहेबांना आश्चर्यच वाटलं. तू कशी काय इथं? बाई म्हणाली, आजची सभा दणक्यात व्हायला पाहिजे असा तुम्ही नवस बोललाय.

शशक'२०२२ - पेच

लेखक साहित्य संपादक यांनी गुरुवार, 12/05/2022 17:17 या दिवशी प्रकाशित केले.
शुभमंगल वधू वर सूचक केंद्राच्या संचालिका, प्रमिला ताई यांचे फार नाव होते. वक्त्या, सामाजिक कार्यकर्त्या, उद्योजिका अशी अनेक बिरुदं त्या मिरवीत होत्या. ऑफिस बंद करायच्या गडबडीत त्यांनी सेक्रेटरीला हाक मारली, मुग्धा, ती मंगळी मुलामुलींची यादी, अमेरिकेतील वरवधू, अपंग वर वधू, पत्रिका पाहणारे, न पाहणारे सगळे नीट सॉर्ट करून ठेवलेस नं? नाहीतर खूप गोंधळ उडतो बघ क्लायंट्स समोर! 'आत येऊ का मॅम ..? ' एक गोरटेली, नाजूक मुलगी विचारत होती. 'ये, ना. कुणाचं नाव नोंदवायचे आहे?' प्रमिला ताईंनी विचारलं. 'अं....माझंच..म्हणजे....'. ती चाचरत म्हणाली. 'पण..तुमच्याकडे LGBTQ ची स्वतंत्र यादी असेल ना..?