Skip to main content

कृष्णबन- ३

लेखक स्वाती दिनेश यांनी बुधवार, 01/07/2015 17:52 या दिवशी प्रकाशित केले.
ह्याआधी:- कृष्णबन- १ कृष्णबन- २ . आता धबधबा, तो ही जर्मनीतला सर्वात उंच धबधबा बघायचा होता. आधीच धबधबा म्हटलं की कोसळत,धबाबा येणार्‍या पाण्याच्या धारा,तो पाण्याचा खळाळता आवाजच संमोहित करतो, इथे तर जर्मनीतला सगळ्यात उंच धबधबा पहायचा होता. १६३ मी. उंचीवरुन कोसळत तो गुटाख नदीकडे धाव घेतो. उत्साहाने आणि उत्सुकतेने आम्ही चालायला सुरूवात केली.

माझं करीयर मार्गदर्शन (!)

लेखक चिनार यांनी बुधवार, 01/07/2015 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
परवाच एक नात्यातला मुलगा भेटला. त्याने नुकतेच इंजिनियरिंग पूर्ण केले होते. भारतीय परंपरेप्रमाणे इंजिनियर झाल्यावर तो पुढे आयुष्यात आपण काय करायच ह्याचा विचार करत होता. बऱ्याच मुलांना इंजिनियरिंग हे आपलं क्षेत्र नाही ही जाणीव शेवटल्या वर्षपर्यन्त होते. पण इथपर्यन्त आलोच आहे तर शेवट बघूनच घेऊ, या विचाराने ते पदवी पूर्ण करतात. कारण इंजिनियरिंग हे मुंबई लोकलच्या गर्दीसारखं असते. लोकल मध्ये चढणं हेच एक आव्हान आहे. आणि एकदा चढलं की नक्की कुठे उतरायचं हे माहिती नसलं तरी आसपासची गर्दी आपल्याला तिथे उतरवतेच. मग स्टेशनचं नाव वाचल्यावर आपण चुकीच्या ठिकाणी आलो हे लक्षात येते.

सफर माद्रिदची----भाग २ आणि समाप्त.

लेखक पद्मावति यांनी बुधवार, 01/07/2015 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
Palacio Real म्हणजे रॉयल पॅलेस ऑफ माद्रिद- येथील एक प्रमुख आकर्षण. युरोपातील प्रमुख राजवाड्यांपैकी याची गणना होते. याच्या सौंदर्याची तुलना फ्रांस च्या Versailles palace आणि विएन्ना च्या Schonbrunn बरोबर करतात. जवळजवळ तीन हजारहूनही अधिक खोल्या, दालने असलेला हा राजवाडा क्षेत्रफळामधे युरोपातील सर्वात मोठा समजला जातो. या सुप्रसिद्ध राजवाड्याच्या तिकिटांच्या भयानक रांगांची ख्याती ऐकून असल्यामुळे आम्ही सकाळी लवकर आवरून, कसबसा ब्रेकफास्ट संपवून हॉटेलवरून निघालो.

पाळणाघर की ....

लेखक शि बि आय यांनी बुधवार, 01/07/2015 16:11 या दिवशी प्रकाशित केले.
सिनियर केजी मध्ये जाणारी ५ वर्षाची अनघा शाळा सुटताच पाळणाघरच्या काकूंकडे गेली. तिथे पोचल्यावर लगेच आपल्या लहान भावाशी खेळू लागली. काकूंनी आवाज दिल्यावर कपडे बदलून, हात-पाय धुवून परत अक्षयशी खेळायला सुरुवात केली. दुपारचे १२.३० झाले तसे काकूंनी अनघाला वाढले आणि ३ वर्षाच्या अक्षयला भरवण्यासाठी बसल्या. जेवणे झाली. अजूनही अनघाला नीट जेवत येत नव्हते. जेवताना अंगावर सांडत होते पण ती कधीही भरवायला सांगत नव्हती की तक्रार करत नव्हती, कारण तशी सोयच नव्हती.

ना गंवाओ नावक ए नीमकश..

लेखक गवि यांनी बुधवार, 01/07/2015 15:11 या दिवशी प्रकाशित केले.
फैझ अहमद फैझ. फराझसोबत साधारण समकालीन असलेला हा आणखी एक पाकिस्तानातला शायर. शायरच नव्हे, तर तो आणखीही बरंच काही होता, या शायराचं नाव साहित्याच्या "नोबेल"साठी अनेकदा स्पर्धेत होतं. जागतिक शांततेसाठीही कायकाय मिळालं त्याला. पण अबोव्ह ऑल, आपल्यासाठी तो एक "दिल के पास" असलेला शायरच. त्याची एक गझल इक्बाल बानूच्या हेलावून टाकणार्‍या आवाजात ऐकली आणि ती कायमची मनात वसतीला आली. तिचे शब्द एव्हाना मला समजले आहेत.. पण.. नेमकं कोणाला उद्देशून आणि कोणत्या परिस्थितीत हे शब्द इतके आर्तपणे म्हटले जाताहेत हे अजूनही कळत नाही. वेगवेगळे अर्थ लागल्यासारखे वाटतात पण वाळूसारखी सटकून जाणारी गजल आहे हेच खरं.

रामप्पा

लेखक अद्द्या यांनी बुधवार, 01/07/2015 12:24 या दिवशी प्रकाशित केले.
कोणत्याही नोकरीत सर्वात जास्त त्रास पगार वेळेवर न मिळण्याचा असतो असं म्हणतील काही लोक. मी म्हणेन एक वेळ ते चालेल , पण मालकाची बायको / मुलगा म्हणून ती/तो मालक बनून आपली नसलेली अक्कल पाजळून तुमच्या फील्ड मधल्या गोष्टी तुम्हाला सांगायला लागले, आणि तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर कंपनी ला त्यांच्यामुळे होत असलेलं नुकसान बघून हि काही करू शकत नाही हा असतो . माझं हि तेच होत होतं . एका नामांकित संस्थेत ट्रेनर आणि सेंटर मेनेजर म्हणून काम करत होतो, नशिबाने माझ्याबरोबरच तिथे लागलेला मार्केटिंग वाला हि प्रचंड उत्साही आणि डोकेबाज होता.

३१ जूनच्या कुर्डुची वाडी( वरल्या अंगाची) येथे झालेल्या कट्ट्याचा वृत्तांत

लेखक दमामि यांनी बुधवार, 01/07/2015 10:34 या दिवशी प्रकाशित केले.
रात्री बरोब्बर साडे अकराला माझा मोबल्या वाजू लागला," अरे दमाम्या, तू कुठेयस रे? गचकलास तर नाही ना? ? पोचले बरं मी कुर्डू वाडीच्या स्मशानात. इथ काळं कुत्रं सुद्धा नाही. तरी आमचे हे म्हणत होते कुठं जातेस रात्रीची कट्ट्याला, त्या दमाम्यावर विश्वास ठेवून …. " माई श्वास घ्यायला क्षणभर थांबल्या त्या संधीचा फायदा उठवत मी बोललो, " माई ,शून्य मिनटात आलोच … "असे म्हणून बायकोवर (म्हणजे बाइक वर ) ढांग टाकली आणि सुसाट सुटलो . स्मशानात पोचतो तर माईसाहेब कुणा काकूशी गप्पात गुंग झाल्या होत्या. मिपाकरांची ही खासियत! यांच्या गप्पा अशा रंगतात की शंका देखील येणार नाही हे पहिल्यांदा भेटतायत म्हणून.

सियाची कहाणी

लेखक मार्मिक गोडसे यांनी बुधवार, 01/07/2015 01:26 या दिवशी प्रकाशित केले.
आज सिया खुष होती. पहिले कारण म्हणजे आज बालवाडीत जाण्यासाठी कोणी तिला आग्रह करत नव्हते व तिच्या घरी मामे ,मावस बहिणी आल्या होत्या. सियाने कपाटातून भातुकलीचा सेट व गाण्यावर नाचणारी बाहुली बाहेर काढली व बेडरूममध्ये भातुकलीचा खेळ मांडला. सिया आज आई झाली होती एरव्ही आई कोणी व्हावे ह्यावरून बहिणींमध्ये भांडने व्हायची. सिया जे जे म्हणेल ते आज मान्य केले जात होते. भातुकलीचा खेळ रंगात आला होता बाहुलीही गाण्यावर ठुमके मारत होती एव्हड्यात सियाला बाहेर घेवून या असे सियाच्या काकुने आवाज दिला. सिया भातुकलीचा खेळ अर्धवट टाकून बाहेर येण्यास तयार नव्हती.

अमेरिकेतील हॉटेलचा अनुभव

लेखक Jack_Bauer यांनी बुधवार, 01/07/2015 00:24 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक मिपाकरांनी माझ्या पहिल्या लेखाला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रोत्साहनामुळे मी हा दुसरा लेख लिहीत आहे - अमेरिकेत आल्यावर माझा पहिला हॉटेलचा अनुभव. मागच्या लेखात मी माझा अमेरिकेला येण्याबाबतचा अनुभव लिहीला होता. http://www.misalpav.com/node/31795 मी न्यूयोर्कमध्ये पोहोचल्यावर मित्राकडे आलो. तो त्याच्या roommates बरोबर राहायचा पण त्याचा roommate समर vacation साठी भारतात गेला होता आणी त्याच्या जागी माझी राहायची सोय झाली. मित्राच्या घरी पोहोचल्यावर गप्पा वगैरे झाल्या.

कधीतरी काहीतरी भाग 3

लेखक prasadoak7 यांनी मंगळवार, 30/06/2015 23:42 या दिवशी प्रकाशित केले.
सायंकाळ झाली की दिवसभर सुनसान निस्तेज फुटपाथ ओसंडून वहायला लागतो. कामावरून जाताना रस्त्यातच भाजी खरेदी करूनच घरी जायच असा जणू अलिखित नियम आजकाल झाला आहे. हल्ली काही वर्षे आबाच रोजची भाजी आणत होते. खर तर हे माईंचे आवडते काम. पण काही वर्षांपूर्वी माई त्या आजारातून बर्‍या झाल्या तेव्हापासुन आबाच भाजी आणत. हळूहळू चालताना आबांना ते जुने दिवस आठवत होते. खरंतर माई पुर्णवेळ गृहीणी. घरची सर्व जबाबदारी आनंदाने त्या घेत होत्या. आबांची सकाळ छान गरमागरम चहाने झाली की त्याना कसे कृतकृत्य वाटे. सगळ आवरून कामाला निघताना आबांच्या हातात जेवणाचा डबा दिला की मग माईचा स्वतःचा दिवस सुरू होई.