मला त्या गावी जायचेय...
शहराच्या मध्यात साठ कुटुंबांची एक चाळ असावी...
स्क्वेअर फुटाचा हिशोब नको, फक्त पाठ टेकवायला एक खोली असावी..
श्रीमंती घरात नसली तरी बेहत्तर, संपूर्ण चाळ मात्र गडगंज असावी..
महिना अखेरच्या पगाराची आस नसावी.. meeting, appraisal, onsiteचा गंध नसावा..
मला त्या गावी जायचेय...
उजव्या भिंतीपलीकडल्या खोलीत पु.ल.
पेडगावची भग्न मंदिरे: भाग १
एप्रिलअखेरचे दिवस. उन अगदी रणरणतंय. अशाच एका पेटत्या दुपारी मी पेडगावला पोहोचतोय. छत्रपती शिवाजी महाराजांनी औंरगजेबाचा सेनापती बहादूरखानाला हूल देऊन वेड्यात काढल्यापासून पेडगाव जास्तच प्रसिद्धीला आलंय. ह्या पेडगावनं थोरल्या महाराजांच्या मृत्युनंतर केवळ नऊ वर्षातच एक दुर्दैवी घटना पाहिलीय. ह्याच बहाद्रूरखानाच्या किल्ल्यात, बहादूरगडात संभाजी महाराजांना विदूषकासारखी टोपी घालून तसेच त्यांचे दोन्ही हात लाकडी फळ्यांना बांधून त्यांची धिंड काढण्यात आली. त्यानंतर येथेच तापती सळई खुपसून डोळे काढण्यात आले तसेच तरवारीने जीभ छाटण्यात आली. काहीच दिवसांनी तुळापूर येथे त्यांची क्रूर हत्त्या करण्यात आली.
ऊब [लघुकथा]
अंधार भीषण पसरला होता. भयाण वारा सुटला होता.
उंच उंच माडी
अन बाहेर मी उभा
मी दारावर टकटक केले. मंद दिवा जळत होता. त्याचा प्रकाश फटीतून बाहेर पडत होता. मी वाट बघितली.
कुंपनाजवळून जात खिडकीखाली उभा राहिलो. टाचा उंचावून आत बघितलं. काहीच हालचाल नाही.
मग पायरीवर बसून राहिलो. एक विडी शिलगावली. पुन्हा एकदा धुळीची वर्तुळं.
मी उठून पुन्हा टकटक केलं. यावेळी जरा भीतीच वाटली. मग उभा राहिलो तसाच. बोचऱ्या थंडीनं अंगावर शिरशिरी आली. पाऊस पडणार आज.
दार अजूनही बंदच. आता काय?
टपोरे थेंब कोसळत राहिले. गढूळ पाण्याचे झरे खळाळू लागले. माडीभोवती तळं साचलं. अंग चोरुन मी पायरीवर निजलो. अगदी दरवाज्याला खेटून.
'आनंद' ह्यातच!
'आनंद'
दुबइत तासाला वगैरे साफसफाई करणारे 'प्रोफेशनल' घरकाम करणारे मिळतात, पैसे पण तसेच, म्हणजे १तासात जितकं होईल तीतकच, पण असेही काही आहेत जे महिन्याला पैसे घेऊन काम करतात, नशीब चांगलं असेल तर विश्वासु वगैरे, बरे काम करणारे मिळतात! पण आम्ही 'नशीब' या शब्दापेक्षा पुढचा प्रकार मिळवलेला.
हा मूळचा हैदराबादचा, घरी ३मुलं आणि छोटी शेती, तोड़कंमोडकं हिंदी, कमी बोलणारा, जाम आद्न्याधारी, विश्वासू, आणि बरेच काही, जे काही हल्ली माणुस म्हणून 'मिसिंग'असतं असं सर्व.
ड्रॅगन....
मित्रांनो,
ही गोष्ट चीनमधील किअांग्सू प्रांतातल्या हुआई गावच्या वू चेंगने लिहिली. त्याचा काळ कुठला होता हे ठामपणे सांगता येत नाही, पण साधारणत: १५०५ ते १५८० दरम्यान हा होऊन गेला असावा. तो त्या काळातील एक बर्यापैकी प्रसिध्द कवी आणि लेखक होता. मींग राजदरबाराच्या बखरीत त्याचा आणि त्याच्या काही काव्यांचा उल्लेख सापडतो.
या महाकाव्याचा किंवा महाकादंबरीचा विषय ह्युएन्संगाची भारतातील यात्रा हा आहे. ही व्यक्ती अर्थातच काल्पनिक नसून खरी आहे. तो दुसरा तिसरा कोणी नसून इतिहासात प्रसिध्दी पावलेला प्रवासी हयुएन्संगच आहे. तो ७ व्या शतकात होऊन गेला.
परिसस्पर्श : यशोगाथा एका व्यावसायिकाची ( सुधारीत )
सेठजींनी पदार्पण केले
एका नव्या कर्यक्षेत्रात
मनोरंजनाच्या उद्योगात
मोठं नव्हतं नाव त्यांच
ह्या नव्या व्यवसायात
तारखा मिळेनात त्यांना
बड्या तारे, तारका, दिग्दर्शकांच्या
पण मागे हटणे नव्हतेच
सेठजींच्या स्वभावात
त्यानी निर्णय घेतला
सिरीयल बनवण्याचा
अनुभव प्राप्त करण्याचा उद्देश तर होताच
ह्या क्षेत्रातही संधी दडल्या होत्या व्यवसायाच्या
अपरिमीत
समस्या आलीच त्यांना इथेही
बड्या दिग्दर्शक, तारे, तारकांच्या तारखांची
पण थांबले ते सेठजी कसले
त्यांनी सुरवात केली
हाती धरून एका नव्या दिग्दर्शकाला
मालिकेची सुरुवात होती
आश्वस्त करणारी
एकसुरी मालिकांच्या गजबजाटात
एक नवा प्रयोग
एक नवा दृष्टीकोन
विषयाची हाताळणी
कविता
कविता करणे माझा छंद आहे
आपणही काहीतरी करतो इतरांपेक्षा वेगळं
साहजिकच झुंडीपेक्षा वेगळा मी
भलताच देऊन जातो आत्मसन्मान
शब्दाला शब्द अन यमकांचा खेळ
लहानपणी वाचलेलं सुभाषित
लख्ख आठवतं
काव्य, शास्त्र , विनोद यांत रस
नसलेला माणूस शेपूट, शिंग
नसलेला पशु आहे
मीही सरसावतो घेऊन पेन ,
ओढून पुढ्यात
कागद वगैरे फर्रकन
मीही गलबलतो शेतकरयांचे, कष्टकरयांचे
दु:ख ऐकून , पाहून
कधी कधी विषण्ण सुद्धा होतो
drawingroom मधल्या खुर्चीत
सैलावत माझेही अश्रू ओघळतात
महागड्या कार्पेटवर
हिंदकळतो हातातला ग्लास
मीही शोक व्यक्त करतो
बलात्काराच्या घृणास्पद घटनांवर
अन् विचार करतो
आज interview ला आलेली
पोरगी एकदम मस्त ह
'फुंथ्रू'..........
मराठी चित्रपट्स्रुष्टी हीच भारतीय चित्रपट्स्रुष्टीची जननी आहे यात कितीही वाद असले तरी ते सत्य आहे. बर मग सांगा कि पहिला चित्रपट हिंदी होता का मराठी असले गौण प्रश्न विचारण्यात काहीही अर्थ नाही. या मराठी चित्रस्रुष्टीचे आजपर्यंत तीन भाग पडतात- एक १९१३ ते १९८० चा काळ ज्यात विविध प्रयोग रसिकांसमोर येत होते. या बाबतीत तरी मराठी हिंदी चित्रस्रुष्टीपेक्षा पुढे होती. दुसरा भाग म्हणजे १९८१ ते २००४ पर्यंतचा काळ. या कालखंडात एक निराशावादी मरगळजन्य स्थिती निर्माण झाली होती. काही वेळानंतर २००४ साली 'श्वास' प्रदर्शीत झाला. तिसरा म्हणजे श्वासपासुन म्हणजे २००४ ते आज २०१६ पर्यंतचा काळ.
मिसळपाव