Skip to main content

त्रिपुरसुन्दरी

लेखक ज्याक ऑफ ऑल यांनी मंगळवार, 13/09/2016 16:09 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या आजवरच्या खाण्या (आणि पिण्याच्या) असंख्य Adventures पैकी हे एक . म्हणजे समजा एखाद दिवशी तुम्हाला कोणी विचारलं की बाबा “चहा मध्ये चहा मिसळून पिऊन पाहिलंयस का कधी ?” किंवा “पानात तांबूल घालून खाल्लायस का कधी ?” “अरे बघ करून मस्त लागतं !!” तर आपण त्याच्याकडे एकतर अत्यंत कुत्सित नजरेने बघू अन म्हणू “डोक्यावर पडलायस की काय ?” पण .... हा किस्सा तश्याच वळणावरून जाता जाता अचानक एका अनपेक्षित ठिकाणी आला अन त्या नंतर ही “बला” - हमे उसका कायल बना गई - हमेशा sssssss के लिये !! तर झालं असं की मी एकदा एका ठिकाणी गेलो होतो जेवायला , सणावाराचं जेवण , ते ही देशस्थांकडील .

लाहौल आणि स्पिती - एक अविस्मरणीय अनुभव (भाग ३)

लेखक पाटीलभाऊ यांनी मंगळवार, 13/09/2016 14:35 या दिवशी प्रकाशित केले.
लाहौल आणि स्पिती - एक अविस्मरणीय अनुभव (भाग १) लाहौल आणि स्पिती - एक अविस्मरणीय अनुभव (भाग २) आज पाचवा दिवस. रात्री एवढी मस्त झोप लागली कि सकाळी उठायला उशीर झाला. असंही आजचा दिवस थोडा निवांत होता. आज काझा च्या आजूबाजूला थोडं फिरायचं होत, किब्बर या गावाला भेट आणि की (Key) येथील मठ (Monastary) बघायचा होता. सकाळी न्याहारी करून निघालो. पेट्रोल भरायला काझा येथील इंडियन ऑइल च्या पेट्रोल पंपवर निघालो.

नाही पुरेसे....

लेखक राजेंद्र देवी यांनी मंगळवार, 13/09/2016 14:09 या दिवशी प्रकाशित केले.
नाही पुरेसे.... जगात शर्यती खूप आहेत नाही पुरेसे चपळपण सशांचे नको राहूस आळशी ठेव आदर्श कासवांचे चांगुलपणाचे दाखले नुसते नाही पुरेसे दाखवायचे लाव हातभार तू पण जग हे आसवांचे विझण्यास सूर्य नाही पुरेसे ढग पावसांचे नको राहूस कोरडा ढाळ चार दोन थेंब आसवांचे राजेंद्र देवी

दिशा

लेखक राजेंद्र देवी यांनी मंगळवार, 13/09/2016 14:04 या दिवशी प्रकाशित केले.
दिशा स्थापना तुझी करतात गणेशा पण मागत नाहीत बुद्धी हे ईशा धांगडधिंगा अन सैराट वागणे लाज वाटत नाही लवलेशा कोठे चाललो आहोत आपण सारे कधी करणार विचार हे गणेशा तूच कर आता चमत्कार काही थांबव या मानवाच्या विनाशा ढोल, ताशे, डिजे कल्लोळ नुसता फाटून गेले कर्ण या कर्कशा नाही ठेवीत पावित्र्य सणांचे सापडत नाही यांना योग्य दिशा राजेंद्र देवी

मनाचा एकांत - cursor च्या सुईने

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 13/09/2016 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
cursor च्या सुईने inbox मधील पत्रे क्लीक्लिक्लीक्लिकत शेवटी हव्या त्या पत्राशी आल्यावर, अत्तराच्या डोळ्यांनी पहातवाचत, blank page वर नजर खिळवून काय काय लिहून पाठवायचे परत याचे तासनतास जाळे विणतेच कि मन! . . . दुसरं काय असतो एकांत म्हणजे तरी? शिवकन्या

श्रावणभुल

लेखक राजेंद्र देवी यांनी मंगळवार, 13/09/2016 09:11 या दिवशी प्रकाशित केले.
श्रावणभुल एक शलाका नभास छेदून गेली तुझ्या आगमनाची वर्दी देऊन गेली विचाराने तुझ्या, हृदयी धडधड वाढली जणू ज्वालामुखीने धरणी कंप पावली तुझ्या आगमनाची सारी तयारी झाली मेघांनी सारी सृष्टी न्हाऊन गेली सारे रस्ते सजले फुलांनी श्वासात सारे वास मिसळून गेली ऊन सावलीचे खेळ खेळता श्रावणभुल पण हरखून गेली राजेंद्र देवी

आठवणींचा वसंत

लेखक राजेंद्र देवी यांनी मंगळवार, 13/09/2016 08:43 या दिवशी प्रकाशित केले.
आठवणींचा वसंत वेळी अवेळी भासे मज चाहूल वाजे तुझे पैंजणांविना पाऊल लागताच तुझी चाहूल मम हृदयी भृंगारव झाला आठवणींची पाणगळ झडली फुटली पालवी चैत्राला शोभून दिसते गळ्यात तुझ्या पर्णफुलांची माला संपले बळ पंखातले नाही मिळाले घरटे या पाखराला काय नेणार बरोबर मज पुसशी नेणार मी या आठवणींच्या वसंताला राजेंद्र देवी

चार्ल्स बुकोवस्कीचं शेवाळं

लेखक इनिगोय यांनी मंगळवार, 13/09/2016 00:31 या दिवशी प्रकाशित केले.
ब-याच महिन्यांपूर्वी एक कविता वाचण्यात आली होती. वाचता वाचताच तिचा केलेला हा भावानुवाद. मूळ कविता चार्ल्स बुकोवस्की या जर्मनीत जन्मलेल्या रशियन नावाच्या अमेरिकन कवीची. ओबडधोबड आयुष्य जगलेला हा लेखककवी लहानपणापासून अनेक थपडा खात हेलकावत राहिला. आत्यंतिक छळ, बेदम मार आणि कुचेष्टा हा दिवस आणि रात्रीसारखा त्याच्या आयुष्याचाच एक भाग होता. त्यातच कुठेतरी लिहितं व्हायची इच्छा कशी कोण जाणे मनात दबा धरून राहिली होती. मात्र प्रकाशकांच्या अगम्य अनुभवांचे धक्के न पचून त्याने लिहिण्याकडे पाठच फिरवली. तसंही त्याच्याभोवतालच्या जगात लेखन उपरं होतंच. ते परागंदा झालं, इतकंच.

व्यक्त न मी कुणास, तुज उमजेन का तरी

लेखक निनाव यांनी सोमवार, 12/09/2016 20:25 या दिवशी प्रकाशित केले.
व्यक्त न मी कुणास, तुज उमजेन का तरी - निनाव (१२.०९.२०१६) व्यक्त न मी कुणास, तुज उमजेन का तरी अव्यक्त गुंत भावनांची, तुज समजेल का तरी आठवून विसरावे तुला, प्रयत्न मज आसवांचे विसरलोच तुला जर कधी, मी उरेन का तरी आस ही जगण्याची मी, सोडली नसली तरी जगलो तुझ्याच साठी, तुज उमगेल का तरी आठवून विचारावे तुला, अर्थ मज जगण्याचे आठवलोच मी नाही तुज, मी उरेन का तरी बहर गोड़ मज स्वप्नांना, कधी येईल का तरी मन बंद पापण्यांना, चिंब भिजवेल का तरी स्पर्श एक तुझे, मज स्वप्न कोवळे स्वप्नांचे भंगूनि स्वप्न तुझे असे, मी उरेन का तरी
काव्यरस

नाचत ने मज

लेखक बहुगुणी यांनी सोमवार, 12/09/2016 19:57 या दिवशी प्रकाशित केले.
आवडलेल्या इंग्लिश गीतांच्या मराठी रुपांतराचा सिलसिला पुढे सुरू ठेवतोय. पिलियन रायडर यांनी अन्यत्र आम्हा घरी धन या धाग्यात म्हंटल्याप्रमाणे Scent of a Woman या चित्रपटातील अल पचिनो या कलाकाराच्या अंध पात्राने टँगो नृत्य करतांना हे गाणं चित्रित झालेलं आहे.