Skip to main content

पार्टी

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 31/05/2016 या दिवशी प्रकाशित केले.
सायंकाळी मित्रा समवेत घरी पार्टी चा बेत ठरला होता.. बीअर मद्य आदी आणुन ठेवले्लेच होते.. मटण आणायचे होते.... दुपारच्या रणरणत्या उन्हात तो खाटकाच्या दुकानांत आला.. १ किलो मटण अशी ऑर्डर दिली.. अन त्याचे लक्ष बाजुला बांधलेल्या उन्हाच्या चटक्यात पाण्याविना तळमळ्णा-या बक-या कडे गेली.. व त्याचे मन हेलावले... पण तो क्षणांत भानावर आला अन विचार करु लागला.... मी संवेदना क्षम व्यक्ति आहे का दांंभिक????
लेखनविषय:

वाचने 3456
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

In reply to by हकु

पुढे त्याच्या आयुष्यात हेमा आली. आणि ते दोघे गाऊ लागले, अगं हेमा माझ्या प्रेमा तुझी माझी जोडी जमली गं कशी झक्कास पोरगी पटली

हे असल्या कविता लिहित राहिलात तर पाण्याविना तळमळ्णा-या बक-या जिवंत राहतील कारण आमच्या सारखे मिपकार हसुन हसुन मरतील ना =))))

मी संवेदना क्षम व्यक्ति आहे का दांंभिक???? मी प्युअर मांसाहारी आहे, माझ्या मनात विचार आले असते याचं भुजिंग करावं की मटण दमबिर्यानी???

दुपारी एक जण मटण्याच्या दुकानात आला होता.. सकाळीच दोन बकरे सोलून ठिवले होतो. वजडी,पाया वेगळे ठेवले्लेच होते.. मटण (फक्त)काढायचे होते.... दुपारच्या रणरणत्या उन्हात तो कौंटरपाशी आला.. १ किलो मटण अशी ऑर्डर दिली.. अन माझे लक्ष बाजुला उघडलेल्या मिपा मुख्यपानाकडे गेले ,सहा दिवसात पाच जिलब्या... व माझे मन भांबावले... पण मी क्षणांत भानावर आलो अन विचार करु लागलो.... वाचकही संवेदना शून्य आहेत का अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरेपूर फायदा????

दुपारी एक जण मेन बोर्डावर आला होता.. सकाळीच आपल्या लाडक्या आयडीची भलामण केली होती. विषय वगैरे पाचपोच नाही फ़क्त टिका करायची होती.... दुपारच्या रणरणत्या उन्हात तो पेज 3 (खरड़फळ्याव) आला.. बंद करा आता जिलब्या अशी ऑर्डर (तंबी) दिली.. अन माझे लक्ष बाजुला उघडलेल्या मिपा मुख्यपानाकडे गेले , माझ्याही कंपुतले आयडी जिलब्या टाकत होते... तरीही मी क्षणांत भानावर आलो (नाही) अन विचार करु लागलो.... काही आयडीनी मिपाची वाट लावली आहे का मी मिपाचा बिन पगारी फूल अधिकारी झालोय???? (आमची शाखा कुठेही नाही, त्रास न करुन घेणे, बाकी आपली मर्जी) बहिर्जी