अनवट किल्ले ७: वज्रेश्वरीचा शेजारी , गुमतारा (Gumtara )
गेल्या आठवड्यात आपण तुंगारेश्वराच्या जंगलातला कामणदुर्ग पाहिला. याच डोंगररांगेला संमातर असणार्या रांगेत असाच एक टोलेजंगी शिखरावर वसविलेला किल्ला आहे, "गुमतारा किंवा गोतारा". या डोंगराच्या उत्तरेला, वज्रेश्वरी आणि गणेशपुरी अशी सुप्रसिध्द पर्यटन स्थळे असूनही हा किल्ला तसा दुर्लक्षितच आहे. अगदी क्वचितच ट्रेकर्सची पावले इकडे वळतात.
गुमतारा असे काहीसे गुढ नाव असलेल्या हा किल्ला इतिहासाबाबतही मुग्ध आहे. हा किल्ला कोणी बांधला हे ज्ञात नाही. या किल्ल्याच्या परिसराचा प्रथम उल्लेख इ.स.१६८९ मध्ये आढळतो.
झटपट ढोकळा
साहित्य: १ कप बेसन, २ टीस्पून रवा, १ टीस्पून तेल, ४ टीस्पून साखर, १/२ टीस्पून मीठ, १/४ जरूरेनुसार पाणी.टीस्पून सायट्रिक अॅसिड, १ रेग्युलर इनो सॅशे, आवश्यकतेनुसार पाणी.
फोडणी साठी - तेल, मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि नंतर वरून घालण्यासाठी १ चमचा साखर ३ चमचे पाण्यात विरघळवून.बारीक चिरलेली कोथिंबीर सजावटीसाठी.
कृती: सगळ्यात आधी कुकर पाणी घालून गॅसवर मोठ्या आचेवर ठेवा. कुकरच्या एका भांड्याला थोडसं तेल लावून घ्या.खानदेश...!
काहि दिवसांपुर्वी एका लग्नाच्या निमीत्ताने जळगाव ला जाण्याचा योग आला. मराठवाड्याबाहेर जाण्याची तशी हि तिसरी - चौथी वेळ, पण आधी बघीतलं ते पुणंच. तिथले ते प्रवेश करताच दिसनारे माॅल्स, अजस्ञ रस्ते माझ्या शहरी मनाला खुप भावायचे. पण माझ्या ह्या खानदेश वारीनं माझ्या डोळ्यवरली ती माॅल ची झापडं पार उतरवली. तसं फार काहि नाहि पाहिलं मी तिथं, पण जे दिसलं ते नक्कीच मनाला सुखावनारं होत.
भाग ३ श्रीसाईसच्चरित - शब्दार्थ आणि भावार्थ
। ॐ कृपासिंधु श्रीसाईनाथाय नमः ।
भाग ३ अध्याय १, ओवी ४३ ते ७७
जेवणाअखेरी आपण जसे डेझर्ट घेतो तसा गुरुमहिम्याचा गोड घास हेमाडपंतांनी मंगलाचारणाच्या शेवटी ठेवला आहे. गुरुकृपेचा नवलावा वर्णन करताना त्यांच्या वाणीला अधिकच गोडवा आला आहे. 'मै तेरा तू मेरा, भाव यही दृढ हो' हे हेमाडपंतानी आचरणात उतरवलं आहे.
हेमाडपंत म्हणतात की सद्गुरु आपल्याला मोक्षाकडे कसा नेईल तर 'ढकलत नेईल'. आई जशी लेकराचं कल्याण करणारच मग लेकराची इच्छा असो किंवा नसो!
बिडी जलायले.....: नाशिकचा उद्योग ०६
( उत्तरार्ध ) :
नाशिकच्या आर्थिक आणि सामाजिक बदलाबरोबर नाशिकचा भूगोल बदलायची ही सुरुवात होती. कारण पारंपरिक किंवा जाती किंवा वर्ण व्यवस्थेवर आधारित करण्याच्याच्या व्यवस्थेला नाशिकपुरते तरी बिडी व्यवसायानेच एका अर्थाने सुरुंग लावला. विशेषतः बहुजन समाजातल्या विशेषतः मागास जातीतील कुटुंबाना त्यांच्या पारंपरिक व्यवसायाव्यतिरिक्त पैसे मिळवण्याची पहिली संधी बिडी उद्योगानेच दिली ही एका अत्यंत महत्वाच्या स्थित्यंतराची सुरुवात होती. आपापली कामे झाल्यावर उरलेल्या वेळात सुरुवातीला बिडीच्या कारखान्यात जाऊन काम करण्याची संधी विशेषतः बहुजन समाजाच्या लोकांना मिळत असे.
इमान... भाग १
"आपल्याले येकडावं तरी इमानात बसाचं हाय गड्या."
डोस्क्यावरून उडणाऱ्या इमानाकडं पाहत गब्ब्या म्हनाला.
"येडा झाला का बे तू..तुले कोन घीन का इमानात?"
"काऊन? तिकीट काडल्यावर तं घ्याच लागीन नं त्याईले."
"असं नाय घेत बे कोनाले. इंग्लिश लोकं असतेत तिथं."
"म्हंजे?? अन तुले काय म्हायती बे?? तिकिट काडून यष्टयीत बसतो तसं इमानात बसाचं."
"यष्टयीसारखं नसते बे..यष्टयीत नीरा कोंबतेत लोकाईले..हा त्याच्या उरावर..थो दुसऱ्याच्या मांडीत..तीन शिटावर सहा-सहा लोकं बसतेत. इमानात जेवढ्या शिटा तेव्हढेच माणसं असते. म्हणून तर आपल्यासारख्याले घेत नाही आतमध्ये.
ख्रिस्त
शांततेचे गात गाणे
अवतरलासी तू भूवरी या
पिचलेल्या गरिबांचा क्रूस
वाहिलास खांद्यावरी या
प्रेम दिधले तू जगाला
वेदना पचवूनीया
का न समजली दयार्द्रता तुझी
तुला खिळवणाऱ्या राक्षसांना
अजूनही संहार होतो
भाविकांचा प्रेमळ जनांचा
क्रूरपणे गिळता तयांना
दिसेल का क्रोध लाजताना
नसती जरी सगळेच प्रेषित
तुझ्यापरी देवाचे सुत
का प्रयत्नांना आज त्यांच्या
कुचेष्टेचे बिरुद लाभे
हात मी निढळावरी लावुनी
उभा इथे शतकानुशतके
वाट तुझी पाहताना
देह पंचत्वी विलीन होतसे
काव्यरस
मिसळपाव